
सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। सायरा शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे सोलापूर युवक अध्यक्ष सुहास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या वतीने सुहास कदम वसुलीचे काम करत असल्याचा दावा त्यांनी केला.
सायरा शेख यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. त्यांच्या या आरोपांमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, सायरा शेख यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. तसेच या आरोपांबाबत सुहास कदम किंवा जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड