सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची धुरा उमेश पवार यांच्याकडे
सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांची पदोन्नतीने अहिल्यानगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी बदली झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) पदाचा प्रभारी कार्यभार सोलापूर शहर उपनिबंधक उमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे
सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाची धुरा उमेश पवार यांच्याकडे


सोलापूर, 04 जुलै (हिं.स.)। सोलापूर जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांची पदोन्नतीने अहिल्यानगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालकपदी बदली झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) पदाचा प्रभारी कार्यभार सोलापूर शहर उपनिबंधक उमेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

सहकार विभागाने अद्याप जिल्हा उपनिबंधक पदावर नियमित अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली नसल्याने किरण गायकवाड यांनी पदभार सोडत उमेश पवार यांच्याकडे कार्यभार सुपूर्द केला.यानिमित्त जिल्हा उपनिबंधक कार्यालयात किरण गायकवाड यांचा सत्कार व निरोप समारंभ आयोजित करण्यात आला. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला, तसेच प्रभारी जिल्हा उपनिबंधक म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या उमेश पवार यांचे स्वागत करण्यात आले.उमेश पवार यांना नुकतीच सहाय्यक निबंधक पदावरून उपनिबंधकपदी पदोन्नती मिळाली असून, ते यापूर्वी सोलापूर शहर उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. नियमित जिल्हा उपनिबंधकाची नियुक्ती होईपर्यंत ते प्रभारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande