
यवतमाळ, 04 जुलै (हिं.स.)।
यवतमाळ तालुक्यातील उमरठा येथील शेतकर्यांने पेरलेले १४ ब्याग सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, त्यामुळे त्याची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी त्या शेतकर्याने तहसीलदार व कृषी विभागाकडे केली आहे. राजेंद्र नागोराव चिंचोळे (वय ६०, उमरठा, ता. नेर) असे तक्रारकर्त्या शेतकर्!यांचे नाव आहे. त्यांनी त्यांच्या सातेफळ येथील शाळेच्या मालकीच्या शेतात ‘ई वर्ग‘ शेतजमीनत हे बियाणे पेरले होते. त्यांनी शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून करारनामाव्दारे खरीप हंगाम सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शेती वहिती करिता भाड्याने घेतली आहे. या शेताच्या हंगामाकरिता विदर्भ अॅग्रो एजन्सी (मनभा, ता. कारंजा (लाड), जि. वाशिम) येथून सोयाबीन बियाणे वाण मागिल तीन जून रोजी एकूण १४ बॅगची खरेदी केली. त्यानंतर २५ जून रोजी शेताची पेरणी केली. परंतु पेरणीनंतर अद्यापपर्यंत कंपनीचे सोयाबीन बियाणे पूर्णपणे उगविलेच नाही. त्याकरिता त्यांनी तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी व कृषी अधिकारी पंचायत समिती, नेर यांच्याकडे तक्रार केली आहे. केलेल्या तक्रारीची तातडीने व गांभीर्याने दखल घेऊन शेताची मोका पाहणी करावी व झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून दोषी कंपनीवर व संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी व झालेले नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरातील इतर शेतकर्!यांमध्ये सुद्धा विविध कंपन्यांच्या बियाण्यांविषयी साशंकता पसरली आहे. भाड्याने शेती घेऊन परिश्रमपूर्वक शेती करणारे शेतकरी राजेंद्र चिंचोळे यांना झालेल्या नाहक त्रासामुळे गावकर्!यांमध्येही संतापाचे वातावरण असून त्यांना भरपाई मिळावी, अशी मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी