नांदेड - देगलूर-बिलोली मतदारसंघात विशेष मतदार पुनरीक्षण अभियान
नांदेड, 04 जुलै, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेद
नांदेड - देगलूर-बिलोली मतदारसंघात विशेष मतदार पुनरीक्षण अभियान


नांदेड, 04 जुलै, (हिं.स.)। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत विशेष सखोल पुनरीक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान बीएलओ घरोघरी भेट देऊन प्रत्येक मतदाराचा 'ईएफ' फॉर्म भरून घेणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रांती डोबे यांनी दिली.

प्रशासनाच्या माहितीनुसार, ईएफ फॉर्म भरून बीएलओकडे सादर करणाऱ्या मतदारांचीच नावे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही पात्र मतदाराने या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande