गोवा : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर स्टार हेल्थचा आरोग्यसेवा उपक्रम
डेंग्यू, मलेरिया, तापावरील त्वरित सल्ल्यासाठी २४x७ ऑनलाइन ओपीडी व होम हेल्थकेअर सुविधा पणजी, 04जुलै (हिं.स.) : मान्सून हंगामात डेंग्यू, मलेरिया, ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंप
स्टार हेल्थचा लोगो


डेंग्यू, मलेरिया, तापावरील त्वरित सल्ल्यासाठी २४x७ ऑनलाइन ओपीडी व होम हेल्थकेअर सुविधा

पणजी, 04जुलै (हिं.स.) : मान्सून हंगामात डेंग्यू, मलेरिया, ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने गोवा आणि मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) आपल्या मान्सून आरोग्यसेवा उपक्रमाचा विस्तार केला आहे. पॉलिसीधारकांसाठी 'टॉक टू स्टार' सेवा आणि सर्वसामान्यांसाठी मोफत २४x७ ऑनलाइन ओपीडी सल्लामसलत उपलब्ध करून देत लवकर निदान व उपचारावर भर देण्यात आला आहे.

कंपनीच्या आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार गोवा आणि मुंबई विभागात ताप व संसर्गजन्य आजारांसाठी होम हेल्थकेअर सेवांचा वापर तिपटीने वाढला आहे. तसेच कंपनीच्या ऑनलाइन ओपीडी सेवेलाही देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले.

पॉलिसीधारकांना ७६७६ ९०५ ९०५ या क्रमांकावर 'टॉक टू स्टार' सेवेद्वारे होम हेल्थकेअर, नियोजित रुग्णालयात दाखल होणे, कॅशलेस उपचार प्रक्रिया आणि नेटवर्क रुग्णालयांबाबत मार्गदर्शन मिळणार आहे. सर्वसामान्य नागरिक स्टार हेल्थ कस्टमर अॅपद्वारे मोफत २४x७ ऑनलाइन डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतील.

स्टार हेल्थ इन्शुरन्सचे मुंबई ऑनलाइन व गोवा विभागाचे व्यवसाय प्रमुख धीरज गोयल यांनी सांगितले की, मान्सूनमध्ये ताप व संसर्गजन्य आजारांच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे यंदा नागरिकांना पहिल्याच टप्प्यात वैद्यकीय सल्ला सहज उपलब्ध करून देण्यावर कंपनीने भर दिला आहे. वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसच्या (एनएसओ) आकडेवारीनुसार गोव्यात खासगी रुग्णालयातील उपचारांचा खर्च मोठा असून त्यातील बहुतांश खर्च नागरिकांना स्वतःच्या खिशातून करावा लागतो. ही आर्थिक दरी कमी करण्यासाठी कंपनीने टेलिकन्सल्टेशन, होम हेल्थकेअर आणि मोफत ऑनलाइन ओपीडी अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

या उपक्रमाअंतर्गत पॉलिसीधारकांना अमर्यादित टेलिकन्सल्टेशन, कॅशलेस होम हेल्थकेअर, परिचारिका सेवा, रक्त तपासण्या, आयव्ही फ्लुइड्स व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरच्या घरी उपचाराची सुविधा दिली जाणार आहे. तसेच बिगर पॉलिसीधारक नागरिकही स्टार हेल्थ कस्टमर अॅपवर नोंदणी करून २४x७ ऑनलाइन ओपीडी सेवेचा लाभ घेऊ शकतात.

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांनी सतत येणारा ताप किंवा संसर्गाची लक्षणे दुर्लक्षित न करता त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande