
परभणी, 04 जुलै (हिं.स.)।
मानवत येथे ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्यात यावे, अशी मागणी आमदार राजेश विटेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. आमदार राजेश विटेकर व आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पाथरी विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आमदार विटेकर यांनी आपल्या मागणी संदर्भातील एक निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. त्याद्वारे, मानवत शहर राष्ट्रीय महामार्गालगत असल्याने येथे अपघातांचे प्रमाण अधिक आहे. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत व जीवितहानी टाळता यावी, यासाठी मानवत येथे ट्रॉमा केअर सेंटरची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गंभीर दखल घेत संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याची माहिती आमदार विटेकर यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis