रत्नागिरी : रायपाटण–पाचल मार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
रत्नागिरी, 4 जुलै, (हिं.स.) । रायपाटण–पाचल (ता. राजापूर) सीमेवरील हरळ परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नीलेश चिमाजी साळवी असे त्यांचे नाव आहे. नीलेश
रत्नागिरी : रायपाटण–पाचल मार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू


रत्नागिरी, 4 जुलै, (हिं.स.) । रायपाटण–पाचल (ता. राजापूर) सीमेवरील हरळ परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नीलेश चिमाजी साळवी असे त्यांचे नाव आहे.

नीलेश साळवी हेत्यांच्या एमएच ०३ एक्स ६९७३ क्रमांकाच्या मोटारसायकलवरून जात असताना एमएच ४६ सीयू २११६ क्रमांकाच्या मासळी वाहतूक करणाऱ्या पिकअप टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत साळवी गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच रायपाटण येथील विनायक लिंगायत यांनी तत्काळ आपले वाहन थांबवून गाडीतील चादरीच्या साहाय्याने जखमीला सुरक्षितपणे उचलले. कोणाचीही वाट न पाहता त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि स्वतःच्या वाहनातून जखमीला रायपाटण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचले होते.

जखमीची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande