अमरावती जिल्हा परिषदेचा लक्ष्यपूर्ती कृती आराखडा
अमरावती, 04 जुलै (हिं.स.) जिल्हा परिषदेच्या विविध योजना, विकासकामे आणि प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी विभागनिहाय लक्ष्यपूर्ती कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आज दिलेत . जिल्हा परिषदेत झाले
जिल्हा परिषदेचा लक्ष्यपूर्ती कृती आराखडा


अमरावती, 04 जुलै (हिं.स.)

जिल्हा परिषदेच्या विविध योजना, विकासकामे आणि प्रलंबित प्रकरणांचा वेळेत निपटारा करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी विभागनिहाय लक्ष्यपूर्ती कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आज दिलेत . जिल्हा परिषदेत झालेल्या आढावा बैठकीत आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छ भारत मिशन, जलजीवन मिशन, ग्रामपंचायत, बांधकाम, लघुसिंचन, कृषी, शिक्षण आणि समाजकल्याण विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विभागांमध्ये समन्वय वाढवून सेवा वितरण अधिक परिणामकारक करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. आरोग्य विभागाच्या सादरीकरणात प्राथमिक आरोग्यकेंद्रे, उपकेंद्रे, हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटरची स्थिती, रिक्त पदे, माता-बाल आरोग्य, संस्थात्मक प्रसूती तसेच मलेरिया व डेंगी प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाडी इमारती, कुपोषित बालकांचे व्यवस्थापन, अमृत आहार योजना आणि मिशन-२८ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सादर करण्यात आली. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जलजीवन मिशन, पाणी गुणवत्तेच्या चाचण्या आणि पाणीटंचाई व्यवस्थापनाची माहिती दिली. ग्रामपंचायत विभागाकडून घरपट्टी-पाणीपट्टी वसुली, अतिक्रमण निर्मूलन, जनसुविधा कामे आणि पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. बांधकाम विभागाने विविध विकासकामांच्या प्रगतीचा अहवाल सादर केला, तर शिक्षण विभागाला शिक्षक उपलब्धता, शाळांतील सुविधा आणि सौरऊर्जा प्रकल्पांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. आपले सरकार, पीजी पोर्टल, सीपीग्रामवरील तक्रारी, न्यायालयीन व चौकशी प्रकरणांचा नियमित आढावा घेऊन त्यांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देशही सत्यम गांधी यांनी दिले.

नागरिककेंद्री प्रशासनावर भर विकासकामांची गुणवत्ता, योजनांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता आणि नागरिककेंद्री प्रशासनाला प्राधान्य देत विभागनिहाय कामकाजाचे नियमित मूल्यमापन सुरू ठेवण्यात येणार आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित बाबींचा वेळेत निपटारा आणि नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाचा विशेष भर असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande