
मुंबई, 04 जुलै (हिं.स.)। ज्या दिवशी प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या राम मंदिरात झाली, तो शिवसैनिकांच्या आयुष्यातील सुवर्ण क्षणांनी लिहिला जाणार क्षण होता.वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न हे त्या दिवशी पूर्ण झाले.पण त्या क्षणाचे साक्षीदार स्वतः उद्धवजी झाले नाहीत ते स्वतः तिकडे निमंत्रण असूनही गेले नाहीत. तो काही राजकीय कार्यक्रम किंवा कोणत्या एका पक्षाने राबविलेला एजेंडा न्हवता.शेवटी आज हिंदू म्हणून भारतीय म्हणून आपल्या सर्वांसाठी ती अभिमानाची गोष्ट होती. अशावेळीस तुम्ही कधी त्या मंदिरात पाऊल देखील ठेवले नाही.किंवा मंदिराच्या उद्घाटनास देखील गेला नाहीत.मग आज मुंबईत महाआरती करून तुम्ही काय मिळवणार आहात.मला वाटत अशा गोष्टी माध्यमांसमोर बोलून हिंदुत्व जाग होत नसत.असे परखड मत गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी शुक्रवार दि.३ रोजी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर व्यक्त केले.
राम मंदिर व्हावे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते मग तुम्ही अमित शहा यांचेकडे बघून तुमचे हिंदुत्व बघणार आहात का ? मग अमित शहा यांनी ३७० कलम हटवले त्याबद्दल त्यांचे तुम्ही अभिनंदन आजपर्यंत का केले नाही ,तुम्ही काश्मीर मध्ये का गेले नाहीत.मला वाटत खोट्या वल्गना करणे आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांना बदनाम करण्यापलीकडे उद्धजीनी पाहिले पाहिजे.फक्त टोमणे मारून नाही तर हिंदुत्व त्यांच्या कृतीतून दिसले पाहिजे.असेही उद्धव ठाकरे यांना मंत्री योगेश कदम यांनी सुनावले.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ते सभागृहात किती वेळा आले .त्यांनी किती प्रश्नांची, लक्षवेधीची उत्तरे दिली.त्यांनी किती खात्यांचा कारभार सांभाळला? त्यामुळे असा सल्ला स्वतः आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री असताना आदित्यनी आपल्या वडिलांना दिला असता तर योग्य झाले असते.आज एकनाथजी शिंदे यांना त्यांच्या सल्याची गरज नाही आहे. मंत्रांच् काम फक्त विधिमंडळात प्रश्न उत्तरे देणे नसते त्यांना कामे देखील करावी लागतात.धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात.यात एकनाथ शिंदे यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिली.
फोडफोडीच्या राजकारणावर केलेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री योगेश कदम म्हणाले की,दरेगावात आदित्य ठाकरे कधी गेले होते.ते आधी साताऱ्यात कधी गेले होते ते विचारा. शेती काय असते ,स्वतःच्या गावाची ओढ काय असते हे आम्हाला यांच्याकडून शिकण्याची गरज नाही.आजच नाही अनेक वर्षापासून एकनाथ शिंदे यांना त्यांच्या गावाविषयी ओढ आहे. त्यामुळे टीका करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे.
मुंबईतील सद्य स्थितीवर झालेल्या टीकेला उत्तर देताना मंत्री कदम म्हणाले की, ज्यावेळी मुंबईत महाविकास आघाडी सत्तेत होती तेव्हा ह्यांचा खात्याशी संबंध नसताना देखील हे मुंबईत जाऊन पाहणी करायचे.तेव्हा केलेल्या वल्गनाचे काय झाले.तीन वर्षापूर्वी तेच म्हटले होते की आता मुंबईत कधीच पाणी तुंबणार नाही.त्याचे काय झाले?
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर