24x7 ऑनलाइन डॉक्टर सल्ला आणि होम हेल्थकेअर; स्टार हेल्थची मान्सून विशेष सुविधा
मुंबई, 04 जुलै, (हिं.स.)। मुंबईत पावसाळा सुरू होत असताना डेंग्यू, मलेरिया, ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांमध्ये नेहमीप्रमाणे वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतातील आघाडीच्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुर
स्टार हेल्थ


मुंबई, 04 जुलै, (हिं.स.)। मुंबईत पावसाळा सुरू होत असताना डेंग्यू, मलेरिया, ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांमध्ये नेहमीप्रमाणे वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतातील आघाडीच्या स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (NSE: STARHEALTH; BSE: 543412) ने मुंबई महानगर प्रदेशात आपला मान्सून आरोग्यसेवा पोहोच उपक्रम अधिक व्यापक केला आहे. “स्टार हेल्थच्या आर्थिक वर्ष 25-26 मुंबई आकडेवारीनुसार ताप आणि संसर्गजन्य आजारांसाठी होम हेल्थकेअर वापरात तिपटीने वाढ झाली आहे.” यासोबतच, कंपनीने अलीकडेच सुरू केलेल्या ऑनलाईन ओपीडी सेवेला देशभरातून उल्लेखनीय प्रतिसाद मिळत असून वाढत्या संख्येने ग्राहक पहिल्या वैद्यकीय सल्ल्यासाठी ही सेवा निवडत आहेत.

पॉलिसीधारकांना टॉक टू स्टार आणि होम हेल्थकेअर सहाय्याशी जोडणे, तसेच सर्वसामान्य नागरिकांना स्टार हेल्थ कस्टमर अॅपद्वारे मोफत 24/7 ऑनलाईन ओपीडी सल्लामसलत सेवा उपलब्ध करून देत या आरोग्यसेवा पोहोच उपक्रमाचा भर लवकर निदान आणि उपचार मिळण्यावर आहे. पॉलिसीधारकांसाठी 7676 905 905 या क्रमांकावरील टॉक टू स्टार सेवा मार्गदर्शित प्रवेश केंद्र म्हणून उपलब्ध आहे : होम हेल्थकेअरसाठी 1 आणि नियोजित रुग्णालयात दाखल होण्यासाठी 2 दाबायचे आहे.

या उपक्रमाबाबत भाष्य करताना स्टार हेल्थ इन्शुरन्सच्या मुंबई ऑनलाईन आणि गोवा विभागाचे व्यवसाय प्रमुख श्री. धीरज गोयल म्हणाले, “मुंबईतील मान्सूनमध्ये ताप, डेंग्यू, मलेरिया आणि संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होणे अपेक्षितच असते, परंतु अनेक कुटुंबे लक्षणे गंभीर होईपर्यंत प्रतीक्षा करतात. यंदाच्या पावसाळ्यात मात्र आमचा प्रयत्न पहिली पायरी अधिक सोपी करण्याचा आहे. पॉलिसीधारक 7676 905 905 या क्रमांकावर टॉक टू स्टार सेवेला कॉल करून होम हेल्थकेअर किंवा नियोजित रुग्णालयात दाखल होण्यासाठी मार्गदर्शन, सहाय्य मिळवू शकतात. तर सर्वसामान्य नागरिक स्टार हेल्थ अॅपद्वारे मोफत 24/7 ऑनलाईन ओपीडी सल्लासेवेचा लाभ घेऊ शकतात. या हंगामात वेळेवर घेतलेला वैद्यकीय सल्ला महत्त्वपूर्ण फरक घडवू शकतो.”

कमी खर्च आणि पावसाळ्यासाठी सज्ज सेवा : होम हेल्थकेअरचे महत्त्व

नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस National Statistical Office (NSO) च्या घरगुती आरोग्य खर्चावरील 80 व्या फेरीतील सर्वेक्षणाच्या 2026 मध्ये प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार आजारपण आणि रुग्णालयात दाखल होण्यामुळे कुटुंबांवर मोठा आर्थिक भार पडतो असे ठळकपणे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात खाजगी रुग्णालयात दाखल होण्याचा सरासरी खर्च 44,580 रु. असून शहरी भागात तो 67,831 रु. इतका आहे. यातील जवळपास 90% खर्च व्यक्ती आणि कुटुंबांना स्वतःच्या खिशातून करावा लागतो.

(स्रोत: https://www.mospi.gov.in/uploads/publications_reports/publications_reports1776676412084_2b4f2b5c-2f1c-446b-8fa3-ec8f125b2b66_Final_Report_no_596_Health_(2).pdf)

स्टार हेल्थच्या मान्सून सहाय्य प्रोटोकॉलद्वारे ही दरी भरून काढण्यासाठी दोन स्पष्ट मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत : पॉलिसीधारकांसाठी टॉक टू स्टार आणि सर्वसाधारण नागरिकांसाठी स्टार हेल्थ कस्टमर अॅपद्वारे मोफत ऑनलाईन ओपीडी या सेवांमुळे लक्षणे गंभीर होण्यापूर्वी किंवा रुग्णालयात जाण्याची गरज निर्माण होण्यापूर्वीच कुटुंबांना वैद्यकीय सल्ला घेण्याचा अधिक सोपा आणि सुलभ पर्याय मिळतो.

पावसाळ्यासाठी तीन महत्त्वाच्या सेवा या उपक्रमांत एकत्र आणण्यात आल्या आहेत:

- पॉलिसीधारकांसाठी अमर्यादित टेलिकन्सल्टेशन: पॉलिसी कालावधीत पॉलिसीधारकांना अमर्यादित टेलिकन्सल्टेशनची सुविधा उपलब्ध असून ताप किंवा संसर्गाची पहिली लक्षणे दिसताच वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यास प्रोत्साहन मिळते.

- पॉलिसीधारकांसाठी टॉक टू स्टार मार्गदर्शन सहाय्य: पॉलिसीधारक 7676 905 905 वर कॉल करून मार्गदर्शन सहाय्य मिळवू शकतात. होम हेल्थकेअरसाठी 1 आणि नियोजित रुग्णालयात दाखल होण्यासाठी 2 दाबा. या सेवेमुळे उपचार प्रक्रियेचे पर्याय, कॅशलेस प्रक्रिया, नेटवर्क रुग्णालयांचे पर्याय आणि आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन मिळते.

- कॅशलेस होम हेल्थकेअर: वैद्यकीय देखरेखीखाली घरी उपचार शक्य असलेल्या पात्र पॉलिसीधारकांसाठी डॉक्टरांनी सुचवलेल्या घरगुती उपचारांचा खर्च स्टार हेल्थ तर्फे केला जातो. यात व्यावसायिक परिचारिका सेवा, नियमित रक्त तपासण्या व मॉनिटरिंग, IV फ्लुइड्स आणि इंजेक्शन्स रुग्णाच्या घरी देण्याची सुविधा समाविष्ट असू शकते.

सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत ऑनलाईन ओपीडी: विशेषतः पावसाळ्यात आढळणाऱ्या सामान्य लक्षणांसाठी बिगर पॉलिसीधारक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी स्टार हेल्थ कस्टमर अॅपद्वारे मोफत 24/7 ऑनलाईन ओपीडी सल्लासेवेचा लाभ घेता येऊ शकतो.

सेवा वापरण्याची पद्धत :

1. स्मार्टफोनवर स्टार हेल्थ कस्टमर अॅप लिंक डाउनलोड करा.

2. नाव, ई-मेल आयडी आणि जन्मतारीख यांसारखी मूलभूत माहिती देऊन नोंदणी करा आणि उपलब्ध आरोग्य विषयक लाभ मिळवा

3. अॅपमधील मेन्यू उघडून Telemedicine पर्याय निवडा.

4. संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांसोबत मोफत ऑनलाइन सल्लासेवा बुक करा.

या उपक्रमाचा भाग म्हणून स्टार हेल्थने विशेषतः शाळेत जाणारी मुले आणि ज्येष्ठ नागरिक असलेल्या कुटुंबांना ‘मान्सून-फर्स्ट हेल्थ प्रोटोकॉल’ पाळण्याचे आवाहन केले आहे : सतत येणारा ताप दुर्लक्षित करू नका, वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या आणि योग्य प्रवेशमार्ग निवडा. पॉलिसीधारक 7676 905 905 वर टॉक टू स्टार सेवेला कॉल करू शकतात, तर पॉलिसी नसलेले ग्राहक स्टार हेल्थ कस्टमर अॅपद्वारे मोफत 24/7 ऑनलाईन ओपीडी सल्लामसलत बुक करू शकता.

या पावसाळ्यात मुंबईतील कुटुंबांसाठी मुख्य संदेश स्पष्ट आहे : सतत येणारा ताप दुर्लक्षित करू नये आणि पॉलिसीधारकांसाठी फोनद्वारे किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत 24/7 ऑनलाईन ओपीडी द्वारे वेळेवर डॉक्टरांचा सल्ला मिळाल्यास लक्षणे गंभीर होण्यापूर्वीच योग्य पावले उचलता येऊ शकतात.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande