यवतमाळ मधून ढरीच्या वाटेवर निघाली दिव्यांगांची पायी वारी
अमरावती, 05 जुलै (हिं.स.) सेवा समर्पण प्रतिष्ठानतर्फे दिव्यांग, दृष्टिहीन बांधवांची यवतमाळ ते पंढरपूर पायी वारी आयोजित केली . या दिव्यांगांच्या वारीची सुरूवात गांधी चौक परिसरातील रुक्मिणी पांडुरंग संस्थानच्या मंदिरातून आज रविवार रोजी सकाळी पावसात
यवतमाळ मधून ढरीच्या वाटेवर निघाली दिव्यांगांची पायी वारी


अमरावती, 05 जुलै (हिं.स.) सेवा समर्पण प्रतिष्ठानतर्फे दिव्यांग, दृष्टिहीन बांधवांची यवतमाळ ते पंढरपूर पायी वारी आयोजित केली . या दिव्यांगांच्या वारीची सुरूवात गांधी चौक परिसरातील रुक्मिणी पांडुरंग संस्थानच्या मंदिरातून आज रविवार रोजी सकाळी पावसात झाली. पाऊस सुरू असतानाही पंढरीच्या दिशेने निघालेल्या या वारीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत केले.

सेवा समर्पण प्रतिष्ठानने तीन वर्षांपूर्वी या वारीच्या उपक्रमाची सुरूवात केली . वारीचे हे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या वारीत दृष्टीहीन दिव्यांग ३० जणांचा समावेश आहे. यवतमाळ ते पंढरपूर हे ५२१ कि.मी. अंतर ही वारी पायी चालत जाणार आहे. या वारीच्या वाटेत गावकरी वारकऱ्यांच्या निवासाची, भोजनाची व्यवस्था करतात. सकाळी मंदीरातून वारीची सुरूवात केली .या वेळी माजी मंत्री मदन येरावार, नगराध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्यासह इतर मान्यवरांनी वारकऱ्यांचे कौतुक केले. त्यानंतर शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत ही वारी निघाली.वारीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.सकाळपासून चांगला पाऊस बसरत असताना या पावसामध्ये ही वारी निघाली. भर पावसात निघालेल्या वारीचे स्वागत करण्यासाठी नागरिक पावसात उभे होते.अशा भर पावसातच ही वारी आगेकूच करीत होती.

दृष्टीहीन आणि दिव्यांग ३० जणांचा समावेश सेवा समर्पण प्रतिष्ठाणच्या वतीने तीन वर्षांपूर्वी या वारीच्या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. वारीचे हे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या वारीमध्ये दृष्टीहीन आणि दिव्यांग ३० जणांचा समावेश आहे. यवतमाळ ते पंढरपूर हे ५२१ किलोमीटर अंतर ही वारी पायी चालत जाणार आहे. या वारीमध्ये दृष्टीहीन आणि दिव्यांग ३० जणांचा समावेश आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande