मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : सहकार मंत्री
लातूर, 05 जुलै, (हिं.स.)। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या संपूर्ण राज्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या महत्त्वपूर्ण
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील


लातूर, 05 जुलै, (हिं.स.)। लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादी अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत असणे अत्यंत आवश्यक आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सध्या संपूर्ण राज्यात मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग नोंदवून आपली अद्ययावत माहिती मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (BLO) उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

राज्यभरात ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविली जात आहे. या अंतर्गत बीएलओ घरोघरी जाऊन मतदारांची माहिती पडताळून पाहत आहेत आणि आवश्यक गणना प्रपत्र भरून घेत आहेत. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी नामदार बाबासाहेब पाटील यांनी शिरूर ताजबंद येथील विशेष पुनरीक्षण कॅम्पला (SIR Camp) भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील मतदारांची माहिती तपासली आणि आवश्यक ते प्रपत्र भरून माहितीचे पुनरीक्षण केले.

यावेळी बोलताना नामदार पाटील म्हणाले की, मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतील सर्वात पवित्र आणि महत्त्वाचा अधिकार आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या मतदार यादीतील नोंदी योग्य आहेत किंवा नाही, याची खात्री करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी बीएलओंची नेमणूक करून ही मोहीम थेट त्यांच्या दारापर्यंत पोहोचविली आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा गैरसमजाला बळी न पडता, प्रत्येक नागरिकाने या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा.

लोकशाहीच्या या प्रक्रियेत नागरिकांनी आपली वैयक्तिक माहिती बीएलओंना अचूकपणे देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी पुन्हा एकदा केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande