वर्ध्याच्या मातीतून दुर्मिळ मुंग्यांचा शोध
अमरावती, 05 जुलै (हिं.स.)। नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक मृदुल जाणे यांनी वर्धा जिल्ह्यातून ‘लेप्टोजेनिस हिस्टेरिका’, ‘पॉलीरॅकिस पंक्टिलाटा’ आणि ‘पॉलीरॅकिस टिबियालिस’ या तीन अत्यंत दुर्मिळ मुंगी प्रजातींचा शोध लावला आहे. महार
वर्ध्याच्या मातीतून दुर्मिळ मुंग्यांचा शोध


अमरावती, 05 जुलै (हिं.स.)। नागपूर विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक मृदुल जाणे यांनी वर्धा जिल्ह्यातून ‘लेप्टोजेनिस हिस्टेरिका’, ‘पॉलीरॅकिस पंक्टिलाटा’ आणि ‘पॉलीरॅकिस टिबियालिस’ या तीन अत्यंत दुर्मिळ मुंगी प्रजातींचा शोध लावला आहे. महाराष्ट्रातून या प्रजातींची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे महत्त्वपूर्ण संशोधन मृदुल जाणे, राकेश्वर कपूर, परविंदर सिंह बैदवान आणि पावनी येथील शिवाजी सायन्स कॉलेजच्या सहयोगी प्राध्यापिका डॉ. सीमा कडू यांच्या संयुक्त प्रयत्नांतून समोर आले आहे.

वर्धा जिल्ह्यातील मुंग्यांच्या विविधतेवर सुरू असलेल्या पीएच.डी. संशोधनादरम्यान या दुर्मिळ प्रजातींचे नमुने संकलित करण्यात आले आहेत. या संशोधनावर आधारित अॅडिशन्स टू द अँट फॉना ऑफ वर्धा डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र, इंडिया (हायमेनॉप्टेरा: फॉर्मिसिडी) हा संशोधन लेख हंगेरी येथून प्रकाशित होणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नॅचुरा सोमोजियेन्सिस या संशोधन नियतकालिकामध्ये प्रकाशित झाला आहे. संशोधकांच्या मते, या शोधामुळे महाराष्ट्रातील मुंग्यांच्या जैवविविधतेच्या नोंदीत महत्त्वपूर्ण भर पडली असून राज्यातील कीटकवैविध्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande