
छत्रपती संभाजीनगर, 05 जुलै (हिं.स.)। शहरात दर महिन्याला २० लाख लीटर खाद्यतेल विक्री होते. त्यातील १० लाख लीटर हे सुटे तेल असते. अन्न व औषध प्रशासनाने सुट्या खाद्यतेलाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई सुरू केल्याने, विक्रेत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीस बंदी आहे. अन्न व औषध प्रशासनाने आतापर्यंत विक्रेत्यांना नोटिसा पाठविल्या, पण कोणत्याही सुटे खाद्यतेल विक्रेत्यावर कारवाई केली नव्हती. मात्र, नुकतेच अन्न व औषध प्रशासनाने सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी येथील एक किराणा स्टोअर्सवर छापा टाकला. येथे ८३ हजार रुपये किमतीचे ५१८ किलो तेल जप्त केले. अस्वच्छ टाकीतील रिफाइंड सोयाबीन तेलाची पाइपद्वारे ग्राहकांना विक्री केली जात होती. या दुकानदाराकडे तेल विक्रीचा वैध परवानाही नव्हता, असे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis