राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन
* ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पतका घेऊन वारकरी दाखल होण्यास प्रारंभ ! पंढरपूर, 05 जुलै (हिं.स.) - वारकर्‍यांचे डोळे ज्या दिंडी सोहळ्याकडे लागतात अखेर तो दिवस अगदी एक दिवसावर आला असून ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर,
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शन


* ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पतका घेऊन वारकरी दाखल होण्यास प्रारंभ !

पंढरपूर, 05 जुलै (हिं.स.) - वारकर्‍यांचे डोळे ज्या दिंडी सोहळ्याकडे लागतात अखेर तो दिवस अगदी एक दिवसावर आला असून ‘ज्ञानबा-तुकाराम’च्या गजरात पंढरपूर, देहू-आळंदीत भगव्या पतका घेऊन वारकरी दाखल होण्यास प्रारंभ झाला आहे. देहू-आळंदी आणि पंढरपूर पांडुरंगाच्या भक्तीत बुडून गेले असून सर्वच चैतन्य, श्री विठ्ठलाच्या भेटीचा अपूर्व ओढ पहायला मिळत आहे. देहू-आळंदी पाऊस असला, तरी दिंड्यांची लगबग चालू आहे. पुणे शहरही या आठवड्यात दिंडीमय झालेले आढळून येणार आहे.

केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांनी रविवारी (५ जुलै) श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.

आषाढी यात्रा सोहळ्यासाठी दिंडीधारकांना जागेची नोंदणी करण्याचे आवाहन

पंढरपूर येथे येणार्‍या दिंड्यांची सोय भक्तीसागर येथे करण्यात येते. येथे ६६८ जागा असून या ठिकाणी भाविकांना तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करून देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. ६ जुलैपासून याची नोंदणी चालू होत असून संबधितांनी भक्तीसागर येथे जागेची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande