
नाशिक, 05 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र ब्रीज असोसिएशन आणिनाशिक जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दिनांक चार आणि पाच जुलै २०२६ दरम्यान एम.बी.ए. लीग ब्रीज स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी खेळविल्या गेलेल्या सहा राउंडनंतर गुणांनुक्रमानुसार फिंटॉन, सरस, फ्रेनीमिस आणि अहमदाबाद हे चार संघ सुपर लीगसाठी पात्र ठरले आहेत. इयान कॉन्सर्ससीन, सुभाष भावनांनी, इवान अल्फोन्सो आणि डॉ. सुबीर रॉय यांच्या फिंटॉन संघाने तिसऱ्या राऊंडनंतर आघाडी घेत ही आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत सहा राऊंड नंतर सर्वात जास्त ९४.८९ गुण संपादन करून पहिला क्रमांकावर झेप घेतली. यानंतर हेमंत पुरकर, राजीव देव, सुधीर गवांदी आणि प्रकाश खेरडे यांचा सरस संघाने त्याखालोखाल ७२.९७ गुणांसह दुसरे स्थान मिळविले आहे.
फ्रेनीमिस संघ ६९.१० गुणांसह तिसरा तर अहमदाबादच्या संघाने ६६. ४५ गुणांसह चवथे स्थान मिळविले होते. या चार संघांमध्ये सकाळच्या सत्रात सुपर लिगचे १४ बोर्डचे दोन राऊंड खेळविले गेले त्यानंतर दुपारच्या सत्रात पुन्हा १४ बोर्डचे दोन राऊंड खेळविले गेले यामध्ये फिंटॉन, संघाने उत्तम कामगिरी करून एकूण ४६.५८ गुणांसह विजेतेपद मिळविले. बाकी तीन संघांना त्यांनी जवळजवळ १८ गुणांचा मोठा फरक होता. बाकी तीन सांघामध्ये चुरस दिसून आली .यामध्ये सरस या संघाने २८.५५ गुण मिळवत उपविजेतेपद मिळविले. तर फ्रेनीमिस या संघाने २४.८३ गुण मिळवत तिसरे स्थान मिळविले. तर अहमदाबाद संघाने २०.८३ गुणांसह चवथे स्थान मिळविले. याचबरोबर आज मॅच पॉईंट पेअर्स या प्रकारामध्ये पेअर्सच्या स्पर्धेमध्ये काल स्विस लीग स्पर्धेमध्ये पाच ते १६ क्रमांकावर असलेल्या खेळाडूंनी या पेअर्स प्रकारात सहभाग घेतला. याप्रमाणे या पेअर्सच्या एकूण २८ पेअर्समध्ये दिवसभर २४ राऊंड्स खेळविले गेले यामध्ये नितीन शिरोळे आणि अजित पडळकर या जोडीने सर्वात जास्त २४८.०५ गुण संपादन करून पेअर्स प्रकारात सर्वात जास्त २४८.०५ गुण मिळवत विजेतेपद पटकावले. त्याखालोखाल कौस्तुभ बेंद्रे आणि संपत श्रीनिवासन या जोडीने सुंदर खेळ करत २४४.६३ गुण मिळवत उप विजेतेपद मिळविले. जे. के. भोसले आणि चंद्रशेखर या जोडीने २४४.२१ अश्या केवळ ०. ४२ च्या फरकाने तिसऱ्या क्रमांकांवर समाधान मानावे लागले. तर चवथ्या क्रमांकावर असलेल्या अनंत सोमाणी आणि राहुल शेट्टी या संघाला अवघ्या ०.१० या एका गुणांच्या फरकाने चवथा क्रमांक मिळाला. या स्पर्धेत दोनही प्रकारात विजेत्या आणि उपविजेत्या तिसरा आणि चवथा क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे अध्यक्ष देवेन दोशी, सचिव हेमंत पांडे आणि ब्रीज असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख अनंत सामंत यांच्या हस्ते आकर्षक चषक प्रदान करून त्यांचा गैरव करण्यात आला. या स्पर्धेचे कॉपिटिशन डायरेक्टर म्हणून भालचंद्र दक्षिणदास आणि सहकारी विश्वनाथ बेडिया, चेतन रावल यांनी आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली. या स्पर्धाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनचे सचिव हेमंत पांडे, मित्र विहार क्लबचे अध्यक्ष तथा ब्रीज खेळाचे संघटक विनोद कपूर, जिल्हा ब्रीज असोसिएशनचे सचिव डॉ. अतुल दशपुते, सूर्या रेड्डी चांगल्या प्रकारे नियोजन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV