
रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । रत्नागिरी विमानतळाकरिता भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्यात आज सामंजस्य करार झाला.
या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उद्योग व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत, विमानतळ विकास कंपनीचे प्रशासकीय अधिकारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, द कमांडिंग ऑफिसर कुणाल सी. नाईक, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे उपस्थित होते.
या सामंजस्य करारामुळे केवळ नागरी विमान वाहतुकीलाच नव्हे, तर किनारपट्टीच्या सुरक्षेला आणि स्थानिक पर्यटनालादेखील मोठी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी