औसा येथे सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या नवीन शाखेचे उद्घाटन उत्साहात
लातूर, 05 जुलै (हिं.स.)। औसा शहरात सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित राहून मान्यवरांनी सहकार चळवळीचे सामाजिक, आर्थिक आणि ग्रामीण विकासातील य
सहकारी बँकेचे उद्घाटन


लातूर, 05 जुलै (हिं.स.)।

औसा शहरात सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या नवीन शाखेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास कार्यक्रमाध्यक्ष म्हणून उपस्थित राहून मान्यवरांनी सहकार चळवळीचे सामाजिक, आर्थिक आणि ग्रामीण विकासातील योगदान अधोरेखित केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला आणि उद्योजक यांना सक्षम करण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. तसेच सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या औसा शाखेच्या यशस्वी व प्रगतीशील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

या कार्यक्रमास आमदार अभिमन्यू पवार, बँकेचे चेअरमन नरेंद्र कांभीरे, राजेश्वर शिवदारे, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, शाखाधिकारी श्रीकांत हुनकेरी, संचालक तुकाराम काळे, पत्रकार राजू पाटील, हनुमंत राचट्टे यांच्यासह बँकेचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande