कोयत्याचा धाक दाखवून लूट; पोलिसांनी अवघ्या १२ तासांत पकडले आरोपी
लातूर, 05 जुलै (हिं.स.)। लातूर शहरातील गांधी चौक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत तिघा आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ओमकार सतीश वा
पोलीस कारवाई


लातूर, 05 जुलै (हिं.स.)। लातूर शहरातील गांधी चौक पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत तिघा आरोपींना अटक केली असून, चोरीस गेलेला १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ओमकार सतीश वाघमारे हे घरी जात असताना गंजगोलाई परिसरातील यशवंत शाळेजवळ तीन अज्ञात आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्या जवळील ७ हजार रुपयांचा मोबाईल आणि ५ हजार रुपये रोख रक्कम, असा एकूण १२ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला.

या प्रकरणी गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४६३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४), ३०९(६) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या १२ तासांत आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गौस शाडूल शेख, मेहराज फरीद शेख आणि शहाबाज शादुल्ला शेख (सर्व रा. अंजली नगर) अशी आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ५ हजार रुपये रोख आणि ७ हजार रुपयांचा मोबाईल, असा एकूण १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय रायपल्ले, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पीएसआय प्रमोद देशमुख तसेच पोलीस अमलदार राजेंद्र टेकाळे, रवीसन जाधव, राम गवारे, संतोष गिरी आणि सचिन चंद्रपाटले यांनी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande