पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण हाच प्रभावी उपाय - गिरीश महाजन
मिशन ग्रीन मॉन्सून अंतर्गत सहा हजार वृक्षांची लागवड , उन्नत नाशिक अभियान नाशिक, 05 जुलै (हिं.स.) : ''उन्नत नाशिक अभियान'' आणि आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या ''हरित कुंभ – हरित मॉन्सून''
Tree plantation is the only


मिशन ग्रीन मॉन्सून अंतर्गत सहा हजार वृक्षांची लागवड , उन्नत नाशिक अभियान

नाशिक, 05 जुलै (हिं.स.) : 'उन्नत नाशिक अभियान' आणि आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येत असलेल्या 'हरित कुंभ – हरित मॉन्सून' अर्थात 'मिशन ग्रीन मॉन्सून' उपक्रमाच्या दुसऱ्या रविवारी नाशिक शहरात सहा हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यामध्ये नाशिक वनराई, म्हसरूळ येथील पिकॉक गार्डन परिसरात २६०० वृक्षांची लागवड करण्यात आली.

वाढते तापमान, अल निनोचे संकट आणि हवामान बदलामुळे निर्माण झालेली पर्यावरणीय आव्हाने लक्षात घेता वृक्षारोपण करणे हाच प्रभावी उपाय आहे, असे प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

ग्रेप काऊंटी येथील कार्यक्रमास महापौर हिमगौरी आडके, आमदार गोकुळ गीते, नगरसेविका दीपाली गीते, रूपाली ननावरे, ग्रेप काउंटीचे किरण चव्हाण, पर्यावरण तज्ज्ञ शेखर गायकवाड, संदीप जाधव यांच्यासह विविध सामाजिक संस्था, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, 'हरित नाशिक' हा केवळ शासकीय उपक्रम न राहता प्रत्येक घराघरात ही चळवळ गेली पाहिजे. नागरिकांनी हरित नाशिकसाठी योगदान दिले पाहिजे. वृक्ष लागवड करून थांबायचे नाही, तर त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही स्वीकारली पाहिजे. मिशन ग्रीन मॉन्सून अंतर्गत एक लाख वृक्षांची लागवड केली जाणार असून त्यांचे संगोपन हेच या अभियानाचे खरे यश ठरणार आहे. 'मिशन ग्रीन मॉन्सून' राबविण्यात येत असून २८ जून ते २५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्रत्येक रविवारी नियोजनबद्ध वृक्षारोपण करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande