
छत्रपती संभाजीनगर, 05 जुलै, (हिं.स.)। महापालिकेत तोतया नगरसेवकांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारीही त्यांचा नगरसेवक म्हणूनच पाहुणचार करीत आहेत. तोतया नगरसेवकांवर कोणत्या कलमानुसार कारवाई करता येऊ शकते, असा प्रश्न माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे विचारला आहे. येणाऱ्या सर्वसाधारण सभेपूर्वी लेखी स्वरूपात ही माहिती द्यावी, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
महापालिकेत ५९ नगरसेविका आहेत. त्यातील मोजक्याच स्वतः काम करतात. बहुतांश जर्णीचे नातेवाईकच मनपात नगरसेवक म्हणून वावरतात. यामध्ये नगरसेविकेचा पती, दीर, मुलगा, जावई, भाऊ यांचा समावेश असतो. नगरसेविका कोण, हे मनपाच्या बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही माहीत नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis