सोलापूर : भोंदू बाबा मनोहर भोसले याच्यावर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल
सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)। स्वतःला देवाचा अवतार असल्याचे भासवून सर्वसामान्यांची दिशाभूल केल्याचा आरोप असलेल्या भोंदू बाबा मनोहर भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. उपचाराच्या नावाखाली आश्रमात आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच ला
सोलापूर : भोंदू बाबा मनोहर भोसले याच्यावर लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल


सोलापूर, 05 जुलै (हिं.स.)। स्वतःला देवाचा अवतार असल्याचे भासवून सर्वसामान्यांची दिशाभूल केल्याचा आरोप असलेल्या भोंदू बाबा मनोहर भोसले यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. उपचाराच्या नावाखाली आश्रमात आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून, याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे दाजी गंभीर आजारी होते. विविध ठिकाणी उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने परिचितांच्या सल्ल्यानुसार संबंधित महिला २०२४ मध्ये मनोहर भोसले यांच्या घोटी येथील आश्रमात गेली होती. तक्रारीनुसार, दाजींना बरे करण्याचे आमिष दाखवत मनोहर भोसले आणि त्याचा मुख्य साथीदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'नाथबाबा' यांनी संगनमताने विविध कारणे सांगून संबंधित महिलेकडून तब्बल १ लाख ६४ हजार रुपये उकळले. तसेच महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर भोसले याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीचे गुन्हे नोंद करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande