आळंदी–पंढरपूर पालखी सोहळ्यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून स्वयंसेवक नोंदणी सुरू
पुणे, 05 जुलै (हिं.स.)। आळंदी–पंढरपूर पालखी सोहळा २०२६च्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने स्वयंसेवक नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ९ ते ११ जुलैदरम्यान होणाऱ्या पालखी सोहळ्यात वाहतूक नियोजन, नागरिकांना मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी
Traffic Jam


पुणे, 05 जुलै (हिं.स.)। आळंदी–पंढरपूर पालखी सोहळा २०२६च्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेने स्वयंसेवक नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. ९ ते ११ जुलैदरम्यान होणाऱ्या पालखी सोहळ्यात वाहतूक नियोजन, नागरिकांना मार्गदर्शन आणि शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी स्वयंसेवकांची मदत घेण्यात येणार असून, इच्छुक नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

वाहतूक शाखेने उपलब्ध करून दिलेल्या अधिकृत ऑनलाइन लिंकद्वारे स्वयंसेवकांना नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करताना आवश्यक माहिती अचूक भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.स्वयंसेवकांना त्यांच्या जबाबदाऱ्या, वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा उपाययोजना आणि पोलिसांशी समन्वय याबाबत माहिती देण्यासाठी ६ आणि ७ जुलै रोजी विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण येरवडा येथील पुणे शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या दोन सत्रांमध्ये होणार आहे.इच्छुक स्वयंसेवकांनी आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी आणि कोणत्याही एका सत्रात उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.दरवर्षी लाखो वारकरी आणि भाविक पालखी सोहळ्यात सहभागी होत असल्याने शहरातील वाहतूक व्यवस्थापन हे मोठे आव्हान असते. अशा परिस्थितीत स्वयंसेवकांच्या सहभागामुळे वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून, नागरिकांनाही सुरक्षित आणि सुकर प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande