रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे विशेष जिल्हा कारागृहात रेनकोट, छत्र्यांचे वाटप
रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ‘कर्तव्याचा जागर फेस्ट २०२६–२७’ या सेवा उपक्रमांतर्गत रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृहातील सुधारित कैद्यांना रेनकोट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृहात कैद्यांच्या
रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीतर्फे विशेष जिल्हा कारागृहात रेनकोट, छत्र्यांचे वाटप


रत्नागिरी, 5 जुलै (हिं.स.) । रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या ‘कर्तव्याचा जागर फेस्ट २०२६–२७’ या सेवा उपक्रमांतर्गत रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृहातील सुधारित कैद्यांना रेनकोट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

रत्नागिरी विशेष जिल्हा कारागृहात कैद्यांच्या पुनर्वसनासाठी व सुटका झाल्यानंतर त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे या उद्देशाने विविध कौशल्य विकास व रोजगारनिर्मितीचे उपक्रम राबविण्यात येतात. त्यापैकी पावसाळ्यात भाजीपाला शेतीचा उपक्रम विशेष महत्त्वाचा असून, कैदी प्रत्यक्ष शेतात श्रम करून शेतीचे प्रशिक्षण घेतात व स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारतात. पावसाळ्यात शेतीचे काम करताना कैद्यांना सुरक्षितपणे काम करता यावे, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने रेनकोट व छत्र्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे, विशेष जिल्हा कारागृहाचे अधीक्षक सचिन पाटील, रोटरी क्लबचे सचिव आनंद चौगुले, सदस्य नीलेश मुळ्ये व परेश साळवी, तसेच हेल्पिंग हँड संस्थेचे सदस्य सचिन शिंदे, जुनेद बंदरकर, शकील गावणकर उपस्थित होते.

यावेळी अध्यक्ष ॲड. मनीष नलावडे म्हणाले, रोटरीचा सेवाभाव हा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. पुनर्वसनाच्या प्रक्रियेत असलेल्या व्यक्तींना प्रोत्साहन व आधार देणे ही समाजाविषयी आपली सामूहिक जबाबदारी आहे.

कारागृह प्रशासनाने रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीच्या या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत रोटरी क्लब ऑफ रत्नागिरीचा कार्याचे कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande