कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र टीईटीची मागणी
सोलापूर, 05 जुलै, (हिं.स.)। उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात यावी आणि ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० टक्के गुणांची अट ठेवावी, अशी मागणी शिक्
tet


सोलापूर, 05 जुलै, (हिं.स.)।

उत्तर प्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घेण्यात यावी आणि ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० टक्के गुणांची अट ठेवावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे. या मागणीसाठी राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहिती शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी दिली.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या निर्णयानुसार २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायदा, २००९ अंतर्गत १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनाच टीईटीची अट लागू होती. नव्या निर्णयानंतर २०१३ पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांनाही टीईटी परीक्षा देणे आवश्यक झाले आहे.शिक्षक भारतीने या निर्णयाबाबत आक्षेप नोंदवत कार्यरत शिक्षकांकडे आवश्यक शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता तसेच अनेक वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असल्याचे नमूद केले आहे. अशा शिक्षकांना नव्याने स्पर्धा परीक्षेच्या धर्तीवरील कठीण टीईटी परीक्षा देण्यास भाग पाडणे न्याय्य नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.त्यामुळे कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्र स्वरूपाची टीईटी परीक्षा घेण्यात यावी, तसेच ती उत्तीर्ण होण्यासाठी किमान ४० टक्के गुणांची पात्रता निश्चित करावी, अशी मागणी संघटनेने शासनाकडे केली आहे. या मागण्यांकडे शासनाने सकारात्मक दखल न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शिक्षक भारतीने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande