फिफा विश्वचषक २०२६ : अमेरिकेत विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्येची नोंद - फिफा
न्यूयॉर्क (अमेरिका), 05 जुलै (हिं.स.)फिफा विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही यजमान देशाच्या तुलनेत अमेरिकेने सर्वाधिक एकत्रित प्रेक्षकसंख्या नोंदवली आहे. सध्या सुरू असलेल्या २०२६ च्या फिफा विश्वचषकादरम्यान फुटबॉलबद्दलची त्या देशाची वाढती आवड यातून अध
फिफा विश्वचृषक ट्रॉफी


न्यूयॉर्क (अमेरिका), 05 जुलै (हिं.स.)फिफा विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही यजमान देशाच्या तुलनेत अमेरिकेने सर्वाधिक एकत्रित प्रेक्षकसंख्या नोंदवली आहे. सध्या सुरू असलेल्या २०२६ च्या फिफा विश्वचषकादरम्यान फुटबॉलबद्दलची त्या देशाची वाढती आवड यातून अधोरेखित होते.

'फोर्थ ऑफ जुलै' (अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन) निमित्त 'एक्स'वर केलेल्या एका पोस्टमध्ये, फुटबॉलच्या जागतिक प्रशासकीय मंडळाने सांगितले की, एकूण प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत अमेरिकेने विश्वचषकाचे यजमानपद भूषवलेल्या इतर सर्व देशांना मागे टाकले आहे.

फिफा विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्याही यजमान देशाच्या तुलनेत अमेरिकेत सर्वाधिक एकत्रित प्रेक्षकसंख्या (८,००८,२१२) नोंदवली गेली आहे. 'फोर्थ ऑफ जुलै'च्या निमित्ताने आम्ही या देशाचे फुटबॉलवरील अफाट प्रेम साजरे करत आहोत! असे फिफाने 'एक्स'वर लिहिले.

हा प्रेक्षकसंख्येचा टप्पा अशा वेळी गाठला गेला आहे जेव्हा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको यांच्यासोबत २०२६ फिफा विश्वचषकाचे सह-यजमानपद भूषवत आहे आणि संपूर्ण स्पर्धेदरम्यान देशभरातील स्टेडियम्समध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे.

दरम्यान, शनिवारी फिलाडेल्फिया येथे झालेल्या 'राऊंड ऑफ १६'च्या सामन्यात पॅराग्वेचा १-० असा पराभव करून फ्रान्सने सलग चौथ्यांदा फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. या विजयामुळे फ्रान्सचा संघ सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या मार्गावर कायम राहिले आहेत.

तत्पूर्वी, ह्युस्टन येथे सह-यजमान कॅनडाचा ३-० असा दणदणीत पराभव करून मोरोक्को उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवणारा पहिला संघ ठरला. कतारमधील २०२२ फिफा विश्वचषकात चौथे स्थान मिळवून इतिहास घडवणाऱ्या मोरोक्को संघाने आपल्या इतिहासात दुसऱ्यांदा अंतिम आठ संघांमध्ये धडक मारली.

मोरोक्कोसाठी अझेडिन ओनाहीने दोन गोल करत चमकदार कामगिरी केली, तर सुफियान रहीमीने तिसरा गोल करून हा प्रभावी विजय पूर्ण केला. या निकालामुळे जागतिक स्तरावर मोरोक्कोची शानदार कामगिरी कायम राहिली आणि आता उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सविरुद्धचा सामना निश्चित झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande