अमरावती-महागडी बियाणे, रिकामे शेत! शेतकरी आर्थिक संकटात
अमरावती, 06 जुलै (हिं.स.) : खरीप हंगामासाठी पेरणी केलेल्या शेतकर्!यांच्या स्वप्नांवर यंदा पाणी फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून सोयाबीनची उगवण अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे या त
महागडी बियाणे, रिकामे शेत! शेतकरी आर्थिक संकटात; सोयाबीन उगवणीच्या तक्रारींनी खळबळ


अमरावती, 06 जुलै (हिं.स.) : खरीप हंगामासाठी पेरणी केलेल्या शेतकर्!यांच्या स्वप्नांवर यंदा पाणी फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून सोयाबीनची उगवण अपेक्षित प्रमाणात झाली नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेष म्हणजे या तक्रारी एखाद्या एका कंपनीपुरत्या मर्यादित नसून विविध ब्रँडच्या बियाण्यांबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

यंदा पावसाच्या सुरवातीला समाधानकारक वातावरण निर्माण झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी झाली. वाढलेले बियाण्यांचे दर, रासायनिक खते, मजुरी आणि मशागतीचा खर्च यामुळे शेतकर्!यांनी मोठी आर्थिक जोखीम पत्करून पेरणी केली. मात्र पेरणीनंतर अनेक ठिकाणी शेतात अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकर्!यांची चिंता वाढली आहे. काही शेतांमध्ये ठिकठिकाणी उगवण झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर रिकामे पट्टे दिसून येत आहेत.

काही ठिकाणी दहा ते वीस टक्केच उगवण झाल्याचा दावा शेतकरी करीत आहेत. परिणामी दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता निर्माण झाली असून त्यासाठी पुन्हा बियाणे, मशागत आणि मजुरीचा खर्च करावा लागणार आहे. आधीच कर्जबाजारी असलेल्या अनेक शेतकर्!यांसाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक ठरत आहे. नेर, बाभूळगाव तसेच इतर तालुक्यांतून उगवणीबाबत तक्रारी येत आहेत. प्रत्येक गावात परिस्थिती वेगळी असली तरी ‘उगवण कमी’ हा मुद्दा सर्वत्र समान असल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशेष म्हणजे विविध कंपन्यांच्या बियाण्यांचा वापर केलेल्या ब्रँडच्या बियाण्यांबाबत शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande