यवतमाळ : गुटखा तस्करांवर कारवाई
यवतमाळ, 06 जुलै (हिं.स.) : शहरातील नंदुरकर शाळेसमोरील पळसवाडी कॅम्प परिसरातील गुटखा तस्कराच्या घरावर रविवारी (ता. पाच) दुपारच्या सुमारास शहर डीबी पथकाने छापा टाकला. यावेळी गुटखा आणि वाहन असे मिळून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा
‘कुमार’च्या घरातून लाखोंचा गुटखा जप्त


यवतमाळ, 06 जुलै (हिं.स.) : शहरातील नंदुरकर शाळेसमोरील पळसवाडी कॅम्प परिसरातील गुटखा तस्कराच्या घरावर रविवारी (ता. पाच) दुपारच्या सुमारास शहर डीबी पथकाने छापा टाकला. यावेळी गुटखा आणि वाहन असे मिळून ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कुमार ओछाणी असे फरार आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात अलीम सलीम बेग (वय ३३, रा. मिटनापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा पदभार तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू केला. सुरवातीला माझा खर्रा विक्रेत्या पानटपरीचालकांवर कारवाई केली. आता हॉटेल व्यावसायीकांसह गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा फार्स आवळण्यात आला आहे. अशाच पद्धतीने शहरातील नंदूरकर शाळेसमोरील पळसवाडी कॅम्प परिसरात कुमार ओछाणी नामक तस्करांकडे लाखो रुपयांचा गुटखा असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली

गुटखा तस्कर कुमार याच्या घरावर छापा टाकला. तेव्हा घरात लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्!यांना बोलावून घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, संपूर्ण गुटखा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुटखा तस्कर कुमार ओछाणी याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पानटपरी चालकांवरील कारवाई नित्याचीच झाली. परंतु एवढी मोठी गुटखा तस्करांवर करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande