मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई दरम्यान दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर प्रभावित
मुंबई, ६ जुलै (हिं.स.) : भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर प्रभावित झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक
मिसिंग लिंक


वाहतूक कोंडी


मुंबई, ६ जुलै (हिं.स.) : भूस्खलन आणि सततच्या मुसळधार पावसामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग या दोन्ही मार्गांवरील वाहतुकीवर गंभीर प्रभावित झाली आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत दोन्ही दिशांची (पुणे-मुंबई आणि मुंबई-पुणे) वाहतूक थांबवण्यात आली आहे. नागरिकांना विनंती आहे की, पुढील सूचना मिळेपर्यंत पुणे आणि मुंबई दरम्यानचा प्रवास पुढे ढकलावा आणि यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या वाहतूकविषयक सूचना व अद्यतनांचे पालन करावे. जनहित आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आम्ही आपल्या सहकार्याची अपेक्षा करत आहे.

मावळ आणि ताम्हिणी घाट परिसरातील काही भाग आणि रस्त्यांवर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे; या भागात पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या पर्यायी मार्गांचाही समावेश होतो.

त्यानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत खालील मार्ग बंद करण्यात आले आहेत:

पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग : काँक्रीटचा खांब पडल्यामुळे 'कनेक्टिंग लिंक' आणि 'मिसिंग लिंक' दरम्यानचा मार्ग बंद.

जुना पुणे-मुंबई महामार्ग : काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे (ओव्हरफ्लो झाल्यामुळे) मार्ग बंद.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande