मावळ तालुक्यात पाटण गावात दरड कोसळल्याची घटना बचावकार्य सुरू
पुणे, ६ जुलै (हिं.स.) : मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकार
मावळ पाटण दरड कोसळली


पुणे, ६ जुलै (हिं.स.) : मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी (DDMO), पुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील ५व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली ३० सदस्यांचे (१ अधिकारी, २ वरिष्ठ अधिकारी व २७ जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी ५.५० वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले.

सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.

पुणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आपत्ती व्यवस्थापन संपर्क क्रमांक

सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खालील आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन क्रमांक जवळ ठेवावेत.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालय – जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष

- लँडलाईन : ०२०-२६१२३३७१

- टोल फ्री हेल्पलाईन : १०७७

- मोबाईल : ९३७०९ ६००६१

पुणे महानगरपालिका (PMC)

- ०२०-२५५०१२५९

- ०२०-२५५०६८००

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)

- ०२०-६७३३११११

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) – पुणे महानगर आपत्ती प्रतिसाद

दल (PDRF)

- ९५४५२ ८२९३०

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande