ब्राझील फिफा विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर नेमारचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला रामराम
न्यूयॉर्क, 06 जुलै (हिं.स.) : ब्राझीलचा महान फुटबॉलपटू आणि राष्ट्रीय संघाचा आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेकडून ब्राझीलचा
ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार


ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार


न्यूयॉर्क, 06 जुलै (हिं.स.) : ब्राझीलचा महान फुटबॉलपटू आणि राष्ट्रीय संघाचा आतापर्यंतचा सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू नेमार ज्युनियरने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेकडून ब्राझीलचा १-२ असा पराभव झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. मेटलाइफ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नेमारने अतिरिक्त वेळेच्या १० व्या मिनिटाला पेनल्टीवर ब्राझीलचा एकमेव गोल केला. पण त्याचा संघ पराभव टाळू शकला नाही आणि विश्वचषकातून बाहेर पडला.

सामन्यानंतर, भावूक झालेल्या नेमारने पत्रकारांना सांगितले, मी माझा सर्वोत्तम प्रयत्न केला. मी सर्व काही करून पाहिले. माझा प्रवास याच मेटलाइफ स्टेडियमवर सुरू झाला आणि इथेच संपत आहे. आता सर्व काही संपले आहे.

नेमारने ब्राझीलसाठी १३० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८० गोल आणि ५९ असिस्ट केले आहेत. तो ब्राझीलच्या इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. विश्वचषकापूर्वी त्याच्या तंदुरुस्तीबद्दल सतत प्रश्न उपस्थित केले जात होते, पण मुख्य प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी त्याच्यावर विश्वास व्यक्त केला आणि २६ सदस्यीय विश्वचषक संघात त्याचा समावेश केला.नेमारने ब्राझीलसोबत २०१३ चा फिफा कॉन्फेडरेशन्स कप जिंकला. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलला पहिले सुवर्णपदक मिळवून देण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. नेमारच्या निवृत्तीने ब्राझिलियन फुटबॉलमधील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. राष्ट्रीय संघासाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्या नावावर कायम राहणार आहै.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande