यवतमाळ - 318 कामांमधून 125 दिवसांचा रोजगार; दर दिवशी 317 रु.मजुरी
यवतमाळ, 08 जुलै, (हिं.स.) केंद्र सरकारने १ जुलैपासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे स्वरूप व्यापक करून “विकसित भारत जी-राम-जी” अधिनियम लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी बाभुळगाव तालुक्या
318 कामांमधून 125 दिवसांचा रोजगार:दर दिवशी 317 रु.मजुरी


यवतमाळ, 08 जुलै, (हिं.स.) केंद्र सरकारने १ जुलैपासून राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे स्वरूप व्यापक करून “विकसित भारत जी-राम-जी” अधिनियम लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी बाभुळगाव तालुक्यातील ‘जी-राम-जी’ योजनेचा औपचारिक शुभारंभ केला. त्यांनी दिघी ग्रामपंचायतीत निवडलेल्या लाभार्थींना प्रत्यक्ष भेट देऊन कामे सुरू केली. दिघी येथील लाभार्थी नामदेव भाकरे यांच्या शेळी गोठा कामासह चिमणापूर येथील राहुल शिंदे यांच्या जलतारा प्रकल्पातून तब्बल ३१८ कामांमधून १२५ दिवसांचा रोजगार उपलब्ध होणार आहे. या अधिनियमांतर्गत मजुरी दर आता रु. ३१७ प्रति दिवस ठरवण्यात आला आहे.

जुनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मर्यादित काळासाठी काम देत होती. मजुरी दर ठराविक होता. कामांची निवड होत होती. तंत्रज्ञानाचा वापर कमी होता. नवीन “विकसित भारत जी-राम-जी” अधिनियमाने योजना व्यापक केली आहे. कामांची संख्या वाढवली आहे. कामांचे प्रकार वाढवले आहेत. मजुरी दर रु. ३१७ प्रति दिवस निश्चित केला आहे. १२५ दिवसांचा रोजगार सुनिश्चित केला आहे. कार्यान्वयनात तांत्रिक सहाय्याला अधिक भर दिला आहे. स्थानिक विकासावर अधिक भर दिला आहे.कुटुंबांचे उत्पन्न वाढेल. स्थानिक पातळीवर टिकाऊ विकासाला चालना मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande