फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हरित महाराष्ट्र अभियान
छत्रपती संभाजीनगर, 08 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत आयोजित हरित सप्ताह अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. य
Q


छत्रपती संभाजीनगर, 08 जुलै (हिं.स.)।

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हरित महाराष्ट्र अभियान अंतर्गत आयोजित हरित सप्ताह अभियानाच्या नियोजनाबाबत जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. अविनाश पाटील गलांडे, निवृत्त शिक्षणाधिकारी एम के देशमुख सर, मा.ज्ञानेश्वर मोठे , सामाजिक वनीकरण विभागाचे गिरी तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हरित महाराष्ट्राच्या संकल्पनेला अधिक बळ देण्यासाठी व्यापक वृक्षारोपण, जनजागृती आणि लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande