लातूर : पोलीस उप महानिरीक्षक घेणार कामकाजाचा आढावा
लातूर, ८ जुलै (हिं.स.) :पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप हे दिनांक ९ जुलै २०२६ रोजी लातूर जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे भेट देणार आहेत. या भेटीदरम्यान दुपारी 3 ते 4 या वेळेत श्री. शहाजी
लातूर : पोलीस उप महानिरीक्षक घेणार कामकाजाचा आढावा


लातूर, ८ जुलै (हिं.स.) :पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप हे दिनांक ९ जुलै २०२६ रोजी लातूर जिल्हा पोलीसांच्या कामकाजाचा मासिक आढावा घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे भेट देणार आहेत.

या भेटीदरम्यान दुपारी 3 ते 4 या वेळेत श्री. शहाजी उमाप हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे उपस्थित राहणार आहेत.नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी किंवा सूचना मांडण्यासाठी या वेळेत पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन पोलीस उप महानिरीक्षक कार्यालय, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांच्याकडून करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande