त्र्यंबकेश्वरमध्ये जोरदार पर्जन्य वृष्टी; पूर सदृश्य परिस्थिती
त्रंबकेश्वर, 08 जुलै, (हिं.स.)। - त्र्यंबकेश्वर मध्ये पहाटे जोरदार पर्जन्य वृष्टी नगरातील रस्त्यावर दर वर्षी प्रमाणे पूर सदृश्य पाणी वाहिले. गेले दोन दिवस संतत धार पाऊस होता काल सायंकाळी पाऊस जोर कमी झालेला होता. त्यात मध्यरात्री नंतर पाऊस जोर वा
Heavy rainfall in Trimbakeshwar


Heavy rainfall in Trimbakeshwar


त्रंबकेश्वर, 08 जुलै, (हिं.स.)। - त्र्यंबकेश्वर मध्ये पहाटे जोरदार पर्जन्य वृष्टी नगरातील रस्त्यावर दर वर्षी प्रमाणे पूर सदृश्य पाणी वाहिले. गेले दोन दिवस संतत धार पाऊस होता काल सायंकाळी पाऊस जोर कमी झालेला होता. त्यात मध्यरात्री नंतर पाऊस जोर वाढला. पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास नगरातील रस्त्यावर दर वर्षी प्रमाणे पूर सदृश्य पाणी वाहिले.

भगवती चौक बोहर पट्टी मेनरोड लक्ष्मी नारायण चौक गंगा काठ स्लॅब या भागात पाणी जवळपास पाऊण तास थांबून होते. त्या नंतर पाण्याचा निचरा झाला . कुंभमेळा कामे ठिकाणी मोठे पाणी साचून मोठ्या प्रमणावर चिखल जमला आहे. पुरात डोंगर माती वाहून येते. चार वाजता पाऊसं कमी झाला.पुष्करणी नदी गंगासागर कडून येणारे पाणी म्हातारं ओहळ निलगंगा गोदावरी नदी अहिल्या नदी असे पाणी अहिल्या गोदावरी संगम घाटात जोरात वाहिले.

पावसाने त्र्यंबकेश्वरला जन जीवन विस्कळीत झाले आहे. तीन दिवसाच्या पावसाने नगरीत पावसाचे पाणी वापरासाठी उपलब्ध झाले. जनावरांसाठी पाणीटंचाई दूर झाली. नागरिक पाणीटंचाईची समस्या असून पाणी वापरासाठी उपलब्ध झाल्याने थोडा दिलासा मिळाला. विजेचा लपंडाव सुरू होता. वृत्तपत्राने आवाज उठवल्यानंतर येथील स्मशान भूमी कडे जाणारा रोड अर्थात पूल बंद करण्यात आला आहे. हा पूल वाहतूक योग्य नसल्याने बंद करण्यात आला आहे. पावसाने त्र्यंबकेश्वर परिसरातील जलाशय तुडुंब भरले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande