नाशिक जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची दमदार हजेरी
नाशिक, 08 जुलै (हिं.स.)। नाशिक - नाशिक शहर आणि जिल्हा परिसरामध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सगळ्यात जास्त पाऊस हा त्रंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यामध्ये नोंदविण्यात आला असून सुरू असलेल्या पावसामुळे नंदिनी नदीला पू
Heavy rains continue in


Heavy rains continue in


Heavy rains continue in


नाशिक, 08 जुलै (हिं.स.)। नाशिक - नाशिक शहर आणि जिल्हा परिसरामध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे सगळ्यात जास्त पाऊस हा त्रंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यामध्ये नोंदविण्यात आला असून सुरू असलेल्या पावसामुळे नंदिनी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे . तर इगतपुरी तालुक्यातील भाहुली धरणाजवळ असलेल्या धामणवाडी या ठिकाणी तसेच मांजरगाव येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आलेले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे पालखेड धरणातूनही 2014 क्युसेस पाण्याचा विसर्ग हा करण्यात येत आहे नाशिक मध्ये ढगफुटी होणार अशी प्राथमिक माहिती वेधशाळेने दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मंगळवारी पूर्ण तयारी करण्यात आलेली होती परंतु त्यानंतरही नाशिक शहर आणि जिल्हा परिसरामध्ये बुधवारी पावसाने जोरदार हजेरी लावली बुधवारी दिवसभरामध्ये 23 किलोमीटर पावसाची नोंद झाली मात्र बुधवारी रात्री जिल्ह्यामध्ये 96 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

मागील 24 तासांमध्ये संपूर्ण जिल्ह्यात 120 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे तसेच सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं त्यामुळे वाहतुकीचे प्रचंड हाल झाले नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. शहरामध्ये झालेल्या पावसामुळे तिडके कॉलनी, गडकरी चौक, त्रंबक नाका, पवन नगर त्रिमूर्ती चौक, यास अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं त्यामुळे तारेवरची कसरत करत नागरिक या पाण्यातून वाटचाल करीत होते. त्यात सुरू असलेल्या शरणपूर रोड भागांमध्ये राजीव गांधी भवन समोरही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्यामुळे या भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झालेली होती. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे नंदिनी नदीला पूर आल्यामुळे नाशिक शहरातून जाणाऱ्या नंदिनी नदीच्या भागांमध्ये वाहतुकी वरती परिणाम झाला या भागातील वाहतूक थांबविण्यात आली.

सातपूर परिसरात असलेल्या मौले मळा भागामध्ये पुलावरून पाणी गेल्यामुळे या भागात वाहतूक बंद करण्यात आली होती तसेच तिडके नगर भागामध्ये असलेल्या मिलिंद नगर या ठिकाणी देखील नंदिनी नदीच्या पुलावरून पाणी जाऊ लागल्यामुळे गोविंद नगर कडे जाणारा मार्ग हा बंद करण्यात आलेला होता. सातत्याने नंदिनी नदीला पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे आयटीआय तुला जवळ असलेल्या लोंढे नगर किंवा आयटीआय नगर या नावाने परिचित असलेल्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांना पाणी बाहेर काढण्यासाठी चांगली कसरत करावी लागली. शहरामध्ये अनेक खड्ड्यांमध्ये वाहन अडकल्यामुळे नागरिकांचे चांगलीच हाल झाले सोमेश्वर जवळ असलेल्या रस्त्याच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या सिटलिक बस सेवे ची बस ही खड्ड्यात अडकल्याने अखेर चालकाने प्रवाशांना उतरून दिलं. तर गोविंद नगर परिसरामध्ये असलेल्या रस्त्याला खचल्यामुळे तडे गेले आहेत. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील मांजरगाव या ठिकाणी पाणी वाढल्यामुळे या भागातील 40 कुटुंबांना दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आलेले आहे. तर बाहुली धरणा जवळ असलेल्या धामणवाडी या ठिकाणी वस्तीच्या शेजारी टेकडी आहे. या टेकडी चा भाग कसल्यामुळे प्रशासनाने धामणवाडी येथील नागरिकांना देखील स्थलांतरित केले आहे. सोमेश्वर जवळ असलेल्या जलालपूर रस्त्यावरील मुलाला पाणी लागल्यामुळे हा पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यामध्ये देखील सुमारे 150 मिली मिटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून या ठिकाणी देखील नदी नाले भरून वाहत आहे. त्याचबरोबर ने नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची नोंद ही त्रंबकेश्वर इगतपुरी नंतर सुरगाणा कळवण दिंडोरी नाशिक या तालुक्यांमध्ये झाली आहे.

--------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande