आयकर विभागाने आयटीआर-5 फॉर्मसाठी एक्सेल युटिलिटी केली जारी
नवी दिल्ली, 08 जुलै (हिं.स.)। आयकर विभागाने मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी आयटीआर-5 फॉर्मची एक्सेल युटिलिटी जारी केली आहे. ती अधिकृत इनकम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर लाइव्ह करण्यात आली आहे, जिथून करदाते ती ऑफलाइन पद्धतीने रिटर्न तयार करण्यासाठी डाउनलोड क
Income Tax Department Releases Excel Utility ITR-5 Form


Income Tax Department Releases Excel Utility ITR-5 Form


नवी दिल्ली, 08 जुलै (हिं.स.)। आयकर विभागाने मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी आयटीआर-5 फॉर्मची एक्सेल युटिलिटी जारी केली आहे. ती अधिकृत इनकम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलवर लाइव्ह करण्यात आली आहे, जिथून करदाते ती ऑफलाइन पद्धतीने रिटर्न तयार करण्यासाठी डाउनलोड करू शकतात.

आयकर विभागाने बुधवारी 'एक्स' वर जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, मूल्यांकन वर्ष 2026–27 साठी आयटीआर-5 ची एक्सेल युटिलिटी जारी करण्यात आली आहे. आता ती इनकम टॅक्स ई फायलिंग पोर्टल https://incometax.gov.in/iec/foportal/ वर उपलब्ध आहे. खरं तर, कोणत्याही आयटीआर फॉर्मसाठी एक्सेल युटिलिटीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय इनकम टॅक्स रिटर्न दाखल करता येत नाही.

आयकर विभागाने आयटीआर फॉर्मच्या ई-फायलिंगची सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू केली आहे. यामध्ये सर्वप्रथम 15 मे रोजी आयटीआर-1 आणि आयटीआर-4 ची एक्सेल युटिलिटी जारी करण्यात आली. त्यानंतर 27 मे रोजी आयटीआर-2 साठी ऑनलाइन फायलिंगची सुविधा सुरू करण्यात आली. त्यानंतर 19 जून रोजी आयटीआर-3 साठी केवळ ऑनलाइन फायलिंग सुरू करण्यात आले नाही, तर त्याची एक्सेल युटिलिटीदेखील जारी करण्यात आली. आता विभागाने मूल्यांकन वर्ष 2026-27 साठी आयटीआर-5 ची एक्सेल युटिलिटीही उपलब्ध करून दिली आहे.

आयकर रिटर्नचा आयटीआर-5 फॉर्म

आयटीआर-5 हा आयकर रिटर्नचा असा फॉर्म आहे, जो वैयक्तिक करदाता किंवा एचयूएफ (हिंदू अविभाजित कुटुंब) नव्हे, तर विविध प्रकारच्या संस्था आणि संघटनांकडून भरला जातो. यामध्ये भागीदारी फर्म, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एलएलपी), असोसिएशन ऑफ पर्सन्स (एओपी), बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स (बीओआय), आर्टिफिशियल ज्युरिडिकल पर्सन (एजेपी), स्थानिक स्वराज्य संस्था, सोसायटी रजिस्ट्रेशन अॅक्ट, 1860 किंवा कोणत्याही राज्याच्या संबंधित कायद्यानुसार नोंदणीकृत सोसायट्या, तसेच अशा ट्रस्टचा समावेश होतो ज्यांना आयटीआर-7 दाखल करण्याची आवश्यकता नसते.

याशिवाय मृत व्यक्ती किंवा दिवाळखोर व्यक्तीच्या संपत्तीचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था, आयकर अधिनियमाच्या कलम 160(1)(iii) आणि 160(1)(iv) अंतर्गत येणारे प्रतिनिधी असेसी, कलम 139(4ई) अंतर्गत येणारे बिझनेस ट्रस्ट आणि कलम 139(4एफ) अंतर्गत येणारे इन्व्हेस्टमेंट फंड यांचा समावेश होतो. हा फॉर्म कोणतीही व्यक्ती, हिंदू अविभाजित कुटुंब (एचयूएफ) आणि कंपनी आयकर रिटर्न दाखल करण्यासाठी भरू शकत नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande