छ. संभाजीनगर : नागरी प्रश्नांसाठी नागरिकांची आ. कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी भेट
छत्रपती संभाजीनगर, 08 जुलै (हिं.स.)। नागरिकांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या परिसरातील विविध नागरी समस्या मांडल्या. छत्रपती संभाजीनगर रोड, जालना येथील महिंद्रा शोरूमच्या पाठीमागील सोरटी नगर व मयुरी रेसिडेन्सी परिसरातील
Q


छत्रपती संभाजीनगर, 08 जुलै (हिं.स.)। नागरिकांनी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपल्या परिसरातील विविध नागरी समस्या मांडल्या. छत्रपती संभाजीनगर रोड, जालना येथील महिंद्रा शोरूमच्या पाठीमागील सोरटी नगर व मयुरी रेसिडेन्सी परिसरातील नागरिकांनी डी.पी. रोड, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन, भूमिगत गटार (अंडरग्राउंड ड्रेनेज), स्ट्रीट लाईट आदी मूलभूत सुविधांबाबतच्या अडचणी मांडल्या. नागरिकांनी मांडलेल्या सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. जनतेचा विश्वास कायम राखत विकासाची वाटचाल सातत्याने सुरू राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande