नाशिक - पडक्या वाड्यांचे निरीक्षण करून मंत्री महाजनांनी दिले उपाययोजना करण्याचे आदेश
नाशिक, 08 जुलै (हिं.स.)। : गेल्या चार-पाच दिवसांपासून पंचवटी परिसरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील जुन्या व पडक्या इमारती तसेच धोकादायक वाड्यांचा काही भाग कोसळण्याच्या घटन
Minister Mahajan inspected


नाशिक, 08 जुलै (हिं.स.)। : गेल्या चार-पाच दिवसांपासून पंचवटी परिसरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे स्थानिक जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे परिसरातील जुन्या व पडक्या इमारती तसेच धोकादायक वाड्यांचा काही भाग कोसळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी (दि. ८) पंचवटीतील धोकादायक वाड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली आणि प्रशासनाला तात्काळ खबरदारीचे उपाय योजण्याचे निर्देश दिले.

गोदावरी नदीला आलेला पूर आणि अखंड सुरू असलेल्या पावसामुळे पंचवटीतील ऐतिहासिक व जुन्या वाड्यांची स्थिती कमालीची खालावली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिस्थितीचा आढावाया पार्श्वभूमीवर, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्यक्ष जमिनीवर उतरून पाहणी दौरा केला. या दौऱ्यात त्यांच्यासोबत महापौर हिमगौरी आडके, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांसह संबंधित विभागांचे अभियंते व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.या पथकाने शनी मंदिर, सरदार चौक आणि पंचवटीतील अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या धोकादायक वाड्यांना भेटी दिल्या. यावेळी अधिकाऱ्यांकडून इमारतींची सद्यस्थिती, सुरक्षेच्या उपाययोजना आणि नागरिकांच्या संभाव्य स्थलांतराबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली.'बेळे' वाड्याची भीषण स्थिती; नागरिकांना स्थलांतराचे आवाहनपाहणीदरम्यान मंत्री महाजन यांनी बेळे यांच्या अत्यंत जीर्ण झालेल्या दुमजली वाड्याची पाहणी केली. या वाड्याची दुरवस्था पाहून त्यांनी तिथे राहणारे भाडेकरू आणि व्यावसायिकांशी थेट संवाद साधला. सततच्या पावसामुळे या वाड्याच्या भिंती आणि मूळ सांगाडा अत्यंत कमकुवत झाला असून तो कधीही कोसळू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.मोठी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी वाड्यात वास्तव्यास असलेल्या मुळे कुटुंबासह इतर सर्व भाडेकरूंना तात्काळ सुरक्षित स्थानी हलवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

चौकट : जीविताची सुरक्षितता ही आपली सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून तात्काळ पर्यायी व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा.

- गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande