अमरावती - सार्वजनिक शौचालयासाठी अंगाला शेण लावून अर्धनग्न आंदोलन
अमरावती, 08 जुलै (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अभिनव विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी आगळेवेगळे आंदोलन केले. प्रभाग क्रमांक 10 मधील वडरपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी अनेक वेळा निवेदन द
सार्वजनिक शौचालयासाठी अंगाला शेण लावून अर्धनग्न आंदोलन,


अमरावती, 08 जुलै (हिं.स.)। अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात अभिनव विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मेश्राम यांनी आगळेवेगळे आंदोलन केले. प्रभाग क्रमांक 10 मधील वडरपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी अनेक वेळा निवेदन देऊनही पूर्ण न झाल्याचा आरोप करत त्यांनी अंगाला शेण लावून अर्धनग्न अवस्थेत मनपा कार्यालय गाठले.

हातात मागण्यांचे बॅनर घेऊन मनपा कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताच प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखले. यानंतर प्रशांत मेश्राम यांनी संताप व्यक्त करत सुरक्षा रक्षकांशी शाब्दिक वाद घातला. त्यांच्या या अनोख्या आंदोलनामुळे मनपा कार्यालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली.घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले..मनपा उपायुक्त देशमुख आणि आरोग्य अधिकारी अजय जाधव यांनी आंदोलक प्रशांत मेश्राम यांची भेट घेतली. वडरपुरा परिसरात सार्वजनिक शौचालय उभारण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर प्रशांत मेश्राम यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande