
छत्रपती संभाजीनगर, 08 जुलै (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य शिक्षक समन्वय संघाच्या धरणे आंदोलनात सहभागी होऊन शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांना खासदार कल्याण काळे यांनी जाहीर पाठिंबा दिला.
शिक्षक हा समाजाचा पाया आहे. भविष्यातील पिढी घडविण्याचे महान कार्य करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या हक्कासाठी आंदोलन करावे लागणे ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, ही अपेक्षा आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांचे सन्मान, सुरक्षितता आणि न्याय्य हक्क यांची हमी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. शिक्षकांचे प्रश्न केवळ त्यांचे नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेशी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित आहेत.
शिक्षकांच्या न्याय्य लढ्याला माझा पूर्ण पाठिंबा. त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी आज या आंदोलनात सहभागी झालो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis