नाशिक - नांदुर मध्यमेश्वर धरणावर अडकलेल्या पंचवीस तरुणांची प्रशासनाने केली सुटका
मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश निफाड, 08 जुलै (हिं.स.) - मासेमारीसाठी नांदूर मधमेश्वर धरणामध्ये गेलेल्या 25 तरुणांची प्रशासनाने बुधवारी सायंकाळी सुखरूप सुटका केली आहे त्यामुळे परिवारासह ग्रामस्थांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. मंत्री छगन भुजबळ
नाशिक - नांदुर मध्यमेश्वर धरणावर अडकलेल्या पंचवीस तरुणांची प्रशासनाने केली सुटका


मंत्री भुजबळांच्या प्रयत्नांना यश

निफाड, 08 जुलै (हिं.स.) - मासेमारीसाठी नांदूर मधमेश्वर धरणामध्ये गेलेल्या 25 तरुणांची प्रशासनाने बुधवारी सायंकाळी सुखरूप सुटका केली आहे त्यामुळे परिवारासह ग्रामस्थांनी सुटकेचा निस्वास सोडला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी लक्ष घातल्यानंतर प्रशासनाने तातडीने नांदूर मध्यमेश्वर धरणाचे मागील गेट बंद करून पाणी प्रवाह बंद केला आणि या तरुणांची सुटका केली

मिळालेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळी गावातील आदिवासी बांधव व तरुण मासेमारीसाठी मध्यमेश्वर मंदिर परिसरातील बेटावर गेले होते. या परिसराला दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा असून काही आदिवासी कुटुंबे तेथे वास्तव्यासही आहेत. दुपारी सुमारे ३ वाजता नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या उजव्या व डाव्या बाजूच्या गेटमधून सुमारे ५५,८४८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढले आणि बेट चारही बाजूंनी पाण्याने वेढले गेले. परिणामी १३ ते २५ वयोगटातील सुमारे २५ तरुण बेटावर अडकून पडले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नदीकाठी मोठी गर्दी केली. राष्ट्रवादीचे नेते हरिश्चंद्र भवर यांनी तातडीने नामदार छगन भुजबळ यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

त्यानंतर भुजबळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून धरणाचे गेट बंद करण्याबाबत सूचना केली. दरम्यान, माहिती मिळताच निफाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी कांतिलाल पाटील, पोलिस उपनिरीक्षक सोनल पडोळ, पोलिस कर्मचारी विनोद जाधव, नितीन सांगळे, धनंजय बैरागी, अरविंद ढवळे, सुनील सानप, राजू दरोडे, तसेच पोलिस पाटील गोरक्षनाथ डांगळे आणि ग्राम महसूल अधिकारी श्रीकांत मोंढे घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धरणाच्या डाव्या बाजूचे गेट बंद करण्यात आले. पाण्याचा प्रवाह काहीसा कमी होताच पोलिसांनी जीव धोक्यात घालून बेटावर अडकलेल्या शुभम माळी, समाधान माळी, रोशन माळी, मंगेश गायकवाड, अंकुश पिंपळे, लखन बर्डे, अजय पवार, दीपक पवार, रविंद्र बर्डे, शुभम बर्डे, खंडू बर्डे, नवनाथ आंबेकर, र आंबेकर, महेश मोरे, महेंद्र पवार, अजय सोनवणे, सागर पवार, समाधान जिरे, यश पवार, भूषण पवार, अजय पवार यांच्य अन्य काही तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली. अथक परिश्रमानंतर सकाळी ६ वाजता मासेमारीसाठी गेलेल्या तर सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सुखरूप सुटका झाल्याने त्याच्या नातेवाईकांसह पोलिस प्रशासनानेही सुटकेचा निश्वास टाकला.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande