सोलापूर विद्यापीठाची पीएचडी पूर्व प्रवेश परीक्षा ऑगस्ट अखेरीस घेण्याचे नियोजन
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील पीएच.डी.पूर्व प्रवेश परीक्षा (PET-10) ऑगस्ट अखेरीस घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या दहाव्या ''पेट'' परीक्षेतून सुमारे ३०० संशोधकांना पीएच.डी. अभ्यासक्र
Univerisity Solapur


सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथील पीएच.डी.पूर्व प्रवेश परीक्षा (PET-10) ऑगस्ट अखेरीस घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या दहाव्या 'पेट' परीक्षेतून सुमारे ३०० संशोधकांना पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी उपलब्ध होणार आहे. यंदाची परीक्षा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने होणार असून, परीक्षा प्रक्रियेत प्रथमच अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (ए आय) आधारित प्रॉक्टरिंग प्रणाली वापरण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून परीक्षेदरम्यान उमेदवारांच्या संशयास्पद हालचालींवर स्वयंचलितपणे नजर ठेवली जाणार आहे. परीक्षेचा संपूर्ण व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्ड केला जाईल. तसेच सर्व परीक्षार्थींना परीक्षा सुरू असताना कॅमेरा आणि मायक्रोफोन सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे.

परीक्षेदरम्यान ब्राउझर लॉक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असल्याने उमेदवारांना मोबाईल, लॅपटॉप किंवा संगणकावर इतर कोणतीही वेबसाइट अथवा विंडो उघडता येणार नाही. अर्ज केलेलाच विद्यार्थी परीक्षा देत असल्याची खात्री करण्यासाठी फेस रिकग्निशन प्रणालीचाही वापर करण्यात येणार आहे. याशिवाय, परीक्षार्थी वारंवार स्क्रीनऐवजी इतरत्र पाहत असल्यास, कोणतेही साहित्य वाचत असल्यास किंवा अनावश्यक हालचाल करत असल्यास, ए आय प्रणाली त्याची नोंद घेईल. मागील वर्षीप्रमाणेच नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित उमेदवाराला परीक्षा प्रक्रियेतून स्वयंचलितपणे अपात्र करण्यात येणार आहे.ऑनलाइन स्वरूपामुळे भारतासह जगातील कोणत्याही देशातून पात्र उमेदवारांना 'पेट-१०' परीक्षा देता येणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande