सोलापूर : माढ्यात भूमी अभिलेख कार्यालयाविरोधात रास्ता रोको आंदोलन
सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। भूमी अभिलेख कार्यालयातील कथित गैरकारभार, कामातील दिरंगाई आणि शेतकरी तसेच नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात माढ्यात आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यासोबतच माढा नगरपंचायतीकडून छत्रपती संभाजी महाराज चौक (कुर्ड
sdfg


सोलापूर, 08 जुलै (हिं.स.)। भूमी अभिलेख कार्यालयातील कथित गैरकारभार, कामातील दिरंगाई आणि शेतकरी तसेच नागरिकांना होत असलेल्या त्रासाविरोधात माढ्यात आज सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यासोबतच माढा नगरपंचायतीकडून छत्रपती संभाजी महाराज चौक (कुर्डूवाडी वळण) येथे हायमास्ट दिवा बसविण्याची मागणीही आंदोलनातून लावून धरली गेली. शंभूराजे ऊर्फ संभाजी अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

आंदोलकांनी भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याचा आरोप केला. तसेच शेतजमिनींची मोजणी आणि इतर महत्त्वाची कामे विनाकारण रखडविली जात असून, एजंटमार्फत येणाऱ्या अर्जांना प्राधान्य दिले जाते आणि सामान्य नागरिकांशी अरेरावीची वागणूक दिली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. याशिवाय, माढा नगरपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही छत्रपती संभाजी महाराज चौकात हायमास्ट दिवा बसविण्यात आलेला नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी वाढत असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले.

या दोन्ही मागण्यां संदर्भात यापूर्वी संबंधित विभागांना निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार सकाळी रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महम्मद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या उपस्थितीत आंदोलन शांततेत पार पडले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande