
छत्रपती संभाजीनगर, 09 जुलै (हिं.स.)। भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने जालना शहर महानगरपालिका प्रभाग क्र. ०१ मधील केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व केंद्रस्तरीय एजंट (BLA२) यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी, मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती, नागरिकांपर्यंत जनजागृती पोहोचविणे तसेच दि. ०९ जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत प्रभाग क्र. ०१ मधील विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) शिबिरांचे नियोजन व अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबिरांमध्ये नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून मतदार यादीतील नावाची पडताळणी, आवश्यक दुरुस्ती व नोंदणी करून या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis