सोलापूर : कुंटणखान्यांवर छापे, चार आरोपींविरुद्ध गुन्हा
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)। सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अकलूज-महाळुंग रोडवरील दोन ठिकाणी धडक कारवाई करत सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून चौघां
सोलापूर : कुंटणखान्यांवर छापे, चार आरोपींविरुद्ध गुन्हा


सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)।

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने अकलूज-महाळुंग रोडवरील दोन ठिकाणी धडक कारवाई करत सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यांचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून चौघांविरुद्ध अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना अकलूज-महाळुंग रोडवरील लयभारी लॉज तसेच त्याच परिसरातील एका नव्या इमारतीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी प्रथम बनावट ग्राहक पाठविला. संशयाची खात्री झाल्यानंतर पथकाने दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.

कारवाईदरम्यान लयभारी लॉजमधून एक तर दुसऱ्या इमारतीतून दोन अशा एकूण तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या महिलांना आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीररीत्या डांबून ठेवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी संबंधित चार जणांविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमान्वये अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या नेतृत्वात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने केली. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक रेवणसिद्ध काळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक सविता कोकणे, शारदा घोळवे, विश्वजित हंचे, हवालदार प्रवीण वाळके, शिवाजी माळी आणि चालक रामनाथ बोंबिलवार यांनी सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande