अमरावती - नवीन बस स्टँड परिसरातील जाहिरात फलक धोकादायक
अमरावती, 09 जुलै (हिं.स.) नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या नवीन बस स्टँड परिसरामध्ये लावण्यात आलेले मोठमोठे जाहिरातीचे फलक (बॅनर) सध्या वाह-नचालक आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. लोखंडी रॉडला अडकवलेले हे भलेमोठे फ्लेक्स हवा आणि पावसामुळे
नवीन बस स्टँड परिसरातील जाहिरात फलक धोकादायक


अमरावती, 09 जुलै (हिं.स.) नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या नवीन बस स्टँड परिसरामध्ये लावण्यात आलेले मोठमोठे जाहिरातीचे फलक (बॅनर) सध्या वाह-नचालक आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. लोखंडी रॉडला अडकवलेले हे भलेमोठे फ्लेक्स हवा आणि पावसामुळे पूर्णपणे फाटले असून, त्यांचे अवशेष सध्या हवेत लटकत आहेत. हे फलक अचानक तुटून चालत्या वाहनांवर कोसळल्यास मोठा आणि भीषण अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

नवीन बस स्टँड हा शहरातील अत्यंत गजबजलेला परिसर असून, येथून दिवस रात्र शेकडो वाहनांची आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेकदा सोसाट्याचा वारा सुटतो. या वार्यामुळे लोखंडी रॉडला अडकलेले फाटके बॅनर हवेत भयानक पद्धतीने उडत आहेत. एखादा मोठा तुकडा अचानक उडून दुचाकी किंवा चारचाकी चालकाच्या तोंडावर अथवा वाहनावर पडल्यास चालकाचे नियंत्रण सुटून गंभीर अपघात घडू शकतो.

या संपूर्ण गंभीर बाबीला संबंधित प्रशासन जबाबदार असून, प्रशासनाच्या या सुस्त कारभाराबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. नगर परिषद प्रशासनाने तातडीने या परिसराची पाहणी करून हवेत लटकणारे आणि धोकादायक ठरलेले हे सर्व बॅनर्स अशी आग्रही मागणी परिस-रातील नागरिक आणि वाहन चालकां कडून केली जात आहे. आता प्रशासन यावर कधी कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande