आशा व गटप्रवर्तक सेविकांचा कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा
कोल्हापूर, 09 जुलै, (हिं.स.)। आशा व गटप्रवर्तक सेविका संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आशा व गटप्रवर्तक सेविकांचा कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा प्रलंबित मा
आशा सेविका संघटना निवेदन देताना


कोल्हापूर, 09 जुलै, (हिं.स.)। आशा व गटप्रवर्तक सेविका संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या नेतृत्वाखाली आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून आशा व गटप्रवर्तक सेविकांचा कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा प्रलंबित मागण्यांसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून शेकडो आशा व गटप्रवर्तक सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परिसर घोषणांनी दणाणून गेला.

दि ३० आणि ३१ मे २०२६ रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे अखिल भारतीय आशा कर्मचारी महासंघाच्या (भारतीय मजदूर संघाचा एक घटक) अखिल भारतीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत, देशातील अनेक राज्यांतील महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि आशा भगिनींच्या समस्यांबाबत सखोल चर्चा व विचारविनिमय झाला. या संदर्भात, ७ ऑक्टोबर २०२५ रोजी, आशा कार्यकर्त्यांनी देशातील सर्व जिल्हा मुख्यालयांसमोर एक दिवसीय आंदोलन आयोजित केले होते आणि आशा कार्यकर्त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना मागणी पत्रासोबत एक निवेदन सादर केले होते, परंतु या मागणी पत्रावर आजपर्यंत कारवाई करण्यास विलंब झाल्यामुळे, आज ९ जुलै २०२६ रोजी, हे मागणी पत्र आणि निवेदन पुन्हा मा. जिल्हाधिकारी ह्यांचे द्वारे मा. पंतप्रधान, भारत सरकार व मा. स्वास्थमंत्री स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार तसेच मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र सरकार ह्यांना सादर करण्यात आले.

आशा व गटप्रवर्तक सेविकांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून मान्यता देणे, किमान वेतन लागू करणे, मानधनात भरीव वाढ करणे, ईएसआय, पीएफ, निवृत्तीवेतन, आरोग्य विमा व इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देणे, तसेच शासनाकडून प्रलंबित असलेल्या सर्व मागण्या तातडीने मंजूर कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या दुर्लक्षाचा निषेध करत आशा व गटप्रवर्तक सेविकांच्या न्याय्य हक्कांसाठी भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. आमच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करा, आशा सेविकांना न्याय द्या अशा घोषणांनी संपूर्णû परिसर दुमदुमून गेला.

आंदोलनानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने डॉ. विजय राठोड जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करून शासनाकडे तातडीने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात आशा व गटप्रवर्तक सेविका संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच जिल्हाभरातील आशा व गटप्रवर्तक सेविका ह्यामध्ये प्रामुख्याने सौ. ज्योती तावरे सचिव अखिल भारतीय आशा कर्मचारी महासंघ,सरीता मोरे , निलम कांबळे, सुरेखा गुरव, संगिता सुर्यवंशी , लता सासणे, मेघा पोवार , शुभांगी मिसाळ, निशा कांबळे, सोनाली चौगुले, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande