‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या दिंडीचे प्रस्थान
सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)। मित्रनगर, शेळगी येथील रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित चौथ्या वर्षीच्या आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. सोलापूर ते आळंदी आणि तेथून पंढरपूर असा आध्यात्मि
Vithal


सोलापूर, 09 जुलै (हिं.स.)। मित्रनगर, शेळगी येथील रुक्मिणी महिला भजनी मंडळाच्या वतीने आयोजित चौथ्या वर्षीच्या आषाढी वारी पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले. सोलापूर ते आळंदी आणि तेथून पंढरपूर असा आध्यात्मिक प्रवास करणाऱ्या या दिंडीत महिला वारकऱ्यांनी विठ्ठल नामाच्या अखंड गजरात सहभाग घेतला.

ह.भ.प. चव्हाण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडीचे प्रस्थान पार पडले. यावेळी माजी नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या हस्ते दिंडीचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. तसेच बाजार समितीचे माजी संचालक बसवराज इटकळे, महालिंगप्पा परमशेट्टी, डॉ. रोहित तंबाके, ज्ञानेश्वर कारभारी आणि विरेश उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती.

टाळ-मृदंगाच्या निनादात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात तसेच अभंग आणि भजनांच्या सुरांनी परिसर भक्तिमय झाला. महिला वारकऱ्यांचा उत्साह, शिस्त आणि विठ्ठलभक्ती पाहून उपस्थित नागरिकांनीही दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

आषाढी वारी ही भक्ती, समता, सेवा आणि संस्कारांचा संदेश देणारी महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. सलग चौथ्या वर्षी रुक्मिणी महिला भजनी मंडळाने ही पायी दिंडी आयोजित करून वारकरी परंपरेचे जतन करण्याबरोबरच समाजात अध्यात्माचे संस्कार रुजविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

दिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन सगर, प्रकाश हांडगे, आकाश चिकमणी, आकाश हांडगे, बालाजी सगर, दत्ता सगर, मनोज सगर, अमित बुरणापुरे, जयराम सुरवसे, घोडसे काका आणि शंकर चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.

ज्ञानोबा-तुकाराम आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठल यांच्या अखंड जयघोषात निघालेल्या या दिंडीला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा देत सर्व वारकऱ्यांच्या सुखरूप आणि मंगलमय वारीसाठी विठ्ठल चरणी प्रार्थना केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande