त्र्यंबकला पावसामुळे सिंहस्थ कामांचे पितळ उघड
त्रंबकेश्वर, 09 जुलै (हिं.स.)। : त्र्यंबकेश्वर शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणेमार्फत विकासकामे सुरू आहेत. यात पुरातत्त्व विभागामार्फत कुशावर्त व कुशावर्त परिसराचे काम केले जात आहे. याशिवाय गोदावरी सुशोभीकरणाचाही समावेश आ
त्र्यंबकला पावसामुळे सिंहस्थ कामांचे पितळ उघड


त्रंबकेश्वर, 09 जुलै (हिं.स.)।

: त्र्यंबकेश्वर शहरात

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध यंत्रणेमार्फत विकासकामे सुरू आहेत. यात पुरातत्त्व विभागामार्फत कुशावर्त व कुशावर्त परिसराचे काम केले जात आहे. याशिवाय गोदावरी सुशोभीकरणाचाही समावेश आहे. दरम्यान, पावसामुळे पुरातत्त्व विभागाच्या कामाचे पितळ उघडे पडले असून, वेदमाता गायत्री देवी मंदिराच्या पाठीमागील नदीकाठच्या दोन्ही भिंतींना सिमेंटने गिलावा करून लावलेल्या टाइल्स गळून पडल्या आहेत.

गेल्या तर काही टाइल्सचा खाली खच पडला आहे. त्यामुळे गोदावरीच्या सुशोभीकरणाचे पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच पुरात केलेल्या बांधकामाचे तीनतेरा वाजल्याने भविष्यात कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल, अशी चिंता आता स्थानिकांना भेडसावू लागली आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande